भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...

भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला नमवलं आणि मालिकाही जिंकली. सलग तीन सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात काय चुकलं? याबाबत न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटरनर याने सांगितलं.

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला आणि मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने विजयासाठी 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने 13.4 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं. यात अभिषेक शर्माने 38 चेंडूत 113 धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 45 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला. तसेच कमबॅक करण्याची संधीच मिळाली नाही. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांना रोखणं कठीण आहे.



काय म्हणाला मिचेल सँटनर?


न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, 'या पद्धतीची फलंदाजी यापूर्वी पाहिली आहे. आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांचा हा अंदाज पाहिला आहे. आता न्यूझीलंडमध्ये त्याचा सामना करावा लागत आहे. जेव्हा हे फलंदाज लयीत असतात तेव्हा त्यांना रोखणं कठीण असते.' न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा आमच्या पारड्यात पडला नाही. डॅरेल मिचेल आणि बेबन जेकबने चांगली भागीदारी केली म्हणून 200 धावांच्या आसपास पोहोचलो. सँटनर पुढे म्हणाला की, अशा खेळपट्ट्यांवर 200 ही चांगली धावसंख्या आहे.



मिचेल सँटनरने भारतीय गोलंदाजांचं कौतुकही केलं. सँटनर म्हणाला की, शेवटची षटकं त्यांनी चांगली टाकली. यॉर्करचा चांगल्या पद्धतीने वापर केला. त्यामुळे न्यूझीलंडला धावा करणं शेवटच्या षटकात कठीण झालं. दरम्यान, दव पडल्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होतं, हे सांगण्यासही विसरला नाही. या फॉर्मेटमध्ये पॉवर प्ले हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि भारताने सुरूवातीच्या सहा षटकात सामना खेचून नेला.


मालिका गमवल्यानंतर न्यूझीलंडपुढे आता कमबॅकचं आव्हान आहे. सँटनरने चौथ्या टी20 सामन्यापूर्वी सांगितलं की, टीम इंडियाच्या फलंदाजांविरुद्ध पुन्हा एकदा रणनिती आखावी लागणार आहे. पुढचा सामना वेन्यू ईडन पार्कवर आहे. तिथलं मैदान चारही बाजूने छोटं आहे. त्यामुळे भारताच्या आक्रमक फलंदाजीला रोखणं आव्हानात्मक ठरू शकते.

Comments
Add Comment

12 चेंडूत अर्धशतक ठोकण्यात अपयशी..! युवराज सिंगने टोमणा मारला, अभिषेक शर्मा दिली मजेशीर प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताचा

अभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम, नेमका काय रेकॉर्ड केला ते जाणून घ्या

[caption id="attachment_1069764" align="aligncenter" width="800"] अभिषेक शर्माने वेलिंग्टन टी20 क्रिकेटमध्ये 11 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय

IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताने

भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 टीम इंडियाने 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली. तिसऱ्या

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम, 35 चेंडूत ठोकलं झंझावती शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठई

IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने