Wednesday, October 28, 2026

Central Government Employes: केंद्रीय सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यामध्ये 3 % ने वाढ

Central Government Employes: केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी दिवाळी भेट दिली आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढीस मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. केंद्र सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावरच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

महागाई भत्ता ही अशी अतिरिक्त रक्कम आहे, जी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वाढती महागाई आणि वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी पैसे देते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराची एक निश्चित टक्केवारी असते. महागाई भत्त्यातील (DA) या 3% वाढीचा अर्थ असा आहे की, कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या मूळ पगारावर 3% अधिक महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये थेट वाढ होईल. महागाईच्या या काळात, सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

अद्याप केंद्र सरकारकडून जीआर जाहीर करण्यात आलेला नाही, लवकरच सरकारकडून यासंबंधितचा आदेश जाहीर करेल. ज्यानंतर वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >