
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य हे खाजगी ठेवणे पसंत केले आहे. त्यांनी आपला मुलगा विहान कौशल यालादेखील कॅमेऱ्यापासून दूर ठेवले आहे. असे असले तरी बऱ्याचदा हे कपल आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलतात. नुकत्याच एका मुलाखतीत कतरिनाने तिचा पती अभिनेता विकी कौशल याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एक वडील म्हणून तो खूप जबाबदार आणि उत्कृष्ट असल्याचे तिने सांगितले.
एका मुलाखतीत कतरिनाने विकीच्या संयमी आणि ऐकून घेण्याच्या स्वभावाचे कौतुक केले. तसेच तिच्यासारख्या सतत बडबड करणाऱ्या व्यक्तीसाठी तो एक आदर्श जोडीदार असल्याचे देखील म्हटले. यावेळी कतरिना म्हणाली, 'विकी एक आदर्श नवरा आहे. तो त्याच्या वयापेक्षा खूप जास्त समजूतदार आहे. त्याची कौटुंबिक मूल्ये खूप पक्की आहे आणि त्यात प्रामाणिकपणाची खरी भावना आहे. व्यवहारात तो हुशार आहे. तो एक उत्तम श्रोता असून मला माझे स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी वाव देतो.'
भारतात रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield) गाड्यांची क्रेझ काही वेगळीच सांगायला नको! 411cc आणि 452cc नंतर आता कंपनी ऑटो मार्केटमध्ये एक मोठा धमाका करायला सज्ज झाली आहे. ...
कतरिनाने विकीच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकानंतरही तिच्यासोबत आणि त्यांच्या मुलासोबत पूर्णपणे उपस्थित राहण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. मात्र तिने हेदेखील मान्य केले की, उच्च प्रतिष्ठित करिअर आणि पालकत्व यांच्यात संतुलन साधल्यामुळे रोमँटिक डिनर आणि मुव्ही नाईट्स कमी झाल्या आहे. 'एक वडील म्हणून तो अप्रतिम आहे. तो थकलेला असताना आणि दिवसाचे १४,१६ आणि १८ तास काम करूनही विहान आणि माझ्यासोबत असताना त्या क्षणी १०० टक्के तो उपस्थित असतो. आमचे रोमँटिक डिनर्स आणि मुव्ही नाईट्स सध्या मागे पडले आहेत पण विकी मला सतत आठवण करून देत असतो की ते दिवससुद्धा पुन्हा येतील.'
आई झाल्यापासू कतरिना बऱ्याच अंशी प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. मात्र अलीकडेच गणपतीच्या निमित्ताने सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओज मध्ये कतरिनाला बॉडीशेमिंगला सामोरे जावे लागले. मुलाच्या जन्मानंतर तिला टीकेला सामोरे जावे लागले. नुकतेच तिने एका कार्यक्रमात ऑनलाईन ट्रॉलर्सना प्रत्युत्तर दिले आणि सोशल मीडियावरील टीकेमुळे आपल्या आत्मसन्मानावर परिणाम होऊ न देण्याच्या महत्त्वावर भाष्य केले.





