Vishnubala : सयाजी शिंदेंचा मुलगा सिद्धार्थ करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून बापलेकाची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सयाजी शिंदे आता मुलासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता नव्या कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांची पुढची पिढी अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमावत असताना, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदेही रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी मराठी चित्रपट ‘विष्णूबाळा’ मधून सिद्धार्थ अभिनयक्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून, विशेष म्हणजे या चित्रपटात तो वडील सयाजी शिंदे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.



‘विष्णूबाळा’मधून सिद्धार्थच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात


मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सयाजी शिंदे आता मुलासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धार्थ सयाजी शिंदे याला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनयक्षेत्राची आवड निर्माण झाली. या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने अभिनयाचे रीतसर प्रशिक्षणही घेतले. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटातूनच करायची, असे सिद्धार्थने ठरवले होते. आता ‘विष्णूबाळा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. पहिल्याच चित्रपटात वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने त्याच्यासाठी हा अनुभव विशेष ठरणार आहे.



वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग


‘विष्णूबाळा’ चित्रपटात सिद्धार्थ एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनयक्षेत्रात पदार्पण करतानाच वडील सयाजी शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने सिद्धार्थ आनंदी आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनाही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे या बापलेकाच्या जोडीला एकत्र अभिनय करताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होण्याची शक्यता आहे.



सत्यघटनेवर आधारित ‘विष्णूबाळा’


‘विष्णूबाळा’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून, रक्तरंजित संघर्षातून उभ्या राहिलेल्या नायकाची कथा यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच चित्रपटातील इतर कलाकारांची कामगिरीही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. तर ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक अनुप जगदाळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.



शिव समर्थ फिल्म प्रोडक्शनची निर्मिती


‘विष्णूबाळा’ या चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेमॅटिक सफारी फिल्म प्रोडक्शन यांच्या बॅनरखाली होत आहे. सचिन क्षीरसागर हे सहनिर्माते असून, आदित्य गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. या भव्य चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ मराठी भाषेतच नव्हे, तर हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.



चार भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट


मराठी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ सयाजी शिंदेसाठी ‘विष्णूबाळा’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. एका बाजूला अनुभवी अभिनेते सयाजी शिंदे यांची मध्यवर्ती भूमिका आणि दुसरीकडे त्यांच्या मुलाचे पदार्पण, यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आता या बापलेकाची जोडी पडद्यावर कोणती जादू निर्माण करते आणि सिद्धार्थ आपल्या पहिल्याच भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

अनिरुद्ध आणि काव्या मारनचा नोव्हेंबरमध्ये पार पडणार विवाहसोहळा; पत्रिकेने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याच्या आमंत्रण

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.

King Movie : ओठांवर गुलाब, डोळ्यांत आग! शाहरुख खानचा ‘किंग’मधील खतरनाक अवतार चर्चेत; रिलीजची तारीखही ठरली

King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता या

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे