दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतला कॅप्टन स्मित! डोक्याच्या फ्रॅक्चरनंतर डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून बसेल धक्का

फ्लाईदुबाई विमानात को-पायलटच्या जीवघेण्या हल्ल्यातून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मछार यांना युएईने सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांच्या डोक्यावरील व्रण असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर झालेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या ब्रेन सर्जरीचा थरारक खुलासा डॉक्टरांनी केला आहे.

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबाई विमान FZ1073 मधील एक धक्कादायक प्रकार 30 सप्टेंबरला समोर आला होता.  या विमानात को पायलटने कॅप्टन स्मित मछार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तेल अवीवला जाणारं विमान पाडण्याच्या दृष्टीने को पायलटने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात कॅप्टन स्मित पूर्णपणे जखमी झाले, पण त्यांनी विमान क्रॅश करण्यापासून वाचवलं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याने हिमतीने लढा दिला.  त्याच्या हिमतीमुळे विमानातील सर्व प्रवाशांचे जीव वाचले होते. या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले होते. इतकंच काय तर जखमा इतक्या गंभीर होता की डोक्याच्या कवटीला तडा गेला होता. त्यामुळे त्यांचं वाचणं कठीण होतं. आता कॅप्टन स्मितच्या डोक्यावरील शस्त्रक्रियेच्या मोठ्या खुणा आणि टाके दाखवणारा एक फोटो समोर आला आहे. डोक्यावरील व्रण पाहून नेमकं काय झालं असेल याचा अंदाज येतो. इतकंच या सर्जरीचं डॉक्टरांनी केलेलं वर्णन ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कॅप्टन स्मितने एकदा नाही तर दोनदा मृत्यूला चकवा दिल्याचं तुम्हाला मान्य करावं लागेल.



काय म्हणाले डॉक्टर?


संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद नाह्यान यांनी 27 ऑक्टोबरला अबू धाबी येथे कॅप्टन स्मित यांचा सन्मान केला. कॅप्टन स्मित आणि त्याच्या क्रूला फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद II हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी स्मित यांच्या डोक्याच्या जखमा दाखवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अमेरिकन न्यूरोसर्जन डॉ. सनत दीक्षित यांनी सांगितलं की, स्मितला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कवटीला तडा गेल्याचा धोका नव्हता, तर मेंदूच्या प्रमुख रक्तवाहिनीला इजा होण्याची भीती होती. कारण हीच रक्तवाहिनी मेंदूतून रक्त बाहेर वाहून नेते. जर तिला इजा झाली तर गंभीर रक्तस्राव झाला असता. गंभीर दुखापतींमध्ये मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका 40 टक्क्यांपेक्षा जास्त असतो.









डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, शस्त्रक्रियेदरम्यान कवटीचा तुटलेला तुकडा काढणं कठीण आणि अत्यंत धोक्याचं होतं. हा तुकडा रक्तवाहिनीवर दाब देऊन रक्तस्राव थांबवू शकत होता. त्यामुळे हा तुकडा काढताना रक्तवाहिनीला इजा होऊ शकली असती. त्यातून तीव्र रक्तस्राव होऊ शकला असता. एक मिनिटात एक लिटरपर्यंत रक्त वाहून जाण्याचा धोका होता. त्यामुळे डॉक्टर स्मित यांना झालेली दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. इतकंच छात्राचित्रात दिसत असलेल्या व्रणांवरून एक बाब स्पष्ट आहे की त्यावर किमान दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असाव्यात. एक कवटीचा भाग काढण्यासाठी आणि दुसरा ते पुन्हा जोडण्यासाठी.. सौदी अरेबियात विमान उतरल्यानंतर स्मित यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आहे. डॉ. शोटा मुसायेव यांनी रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमांवर जवळपास 45 मिनिटे दाब दिला होता. त्यानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

Comments
Add Comment

Arnab Cyclone: चक्रीवादळ ‘अर्णब’च्या संकटात केंद्र सरकार धावले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मदतीचे आश्वासन

चक्रीवादळ 'अर्णब'मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी

‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव कायम! देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर 'अर्णब' हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ काहीसे कमकुवत झाले असले, तरी त्याचा

PM VGSY: ग्रामीण विकासाला नवी दिशा! ‘प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेला’ मंजुरी; 7,395 कोटींची भरीव तरतूद

नवी दिल्ली: ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, सुशासन आणि विकास नियोजन अधिक प्रभावी

Cyclone Arnab Update: सावधान! भारतासह नेपाळवर 'अर्णब' चक्रीवादळाचे भीषण संकट, 5 जणांचा मृत्यू तर 57 ट्रेन रद्द!

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि

Indian Railway News: प्रवाशांनो, एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: रेल्वेने जुने नियम पुन्हा आमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लांबपल्ल्याच्या प्रवाशाला जाणाऱ्या

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, 20 ची कचोरी पडली 20 लाखांना; कसं काय CCTV व्हिडिओमधून प्रकार उघड

जयपूर : अवघ्या 20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबलेल्या एका कलेक्शन एजंटला तब्बल 20 लाख रुपयांचा फटका बसल्याची