Hong Kong Sixes: शशांक सिंगची फटकेबाजी; मात्र भारताला पाकिस्तानविरुद्ध विजयाने हुलकावणी

Hong Kong Sixes स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या लढतीत भारताची झुंज अपुरी ठरली. भारताने 6 षटकांत 88 धावा केल्या; मात्र ख्वाजा नफे आणि अब्बास आफ्रिदी यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने अवघ्या 3.5 षटकांत लक्ष्य गाठत 4 विकेट्सने विजय मिळवला. आता भारतासाठी UAE विरुद्धचा पुढील सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

हॉंगकॉंग : हॉंगकॉंग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'क' गटातील सामना चांगलाच रंगला. मात्र, भारताने दिलेले 89 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने अवघ्या 3.5 षटकांत पूर्ण करत 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. शशांक सिंगच्या आक्रमक खेळीने भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 षटकांत 5 गडी गमावून 88 धावा केल्या. शशांक सिंगने अवघ्या 11 चेंडूंत 40 धावांची तडाखेबंद खेळी करत संघाच्या धावसंख्येला वेग दिला. मात्र, सलामीवीर राहुल त्रिपाठी (9) आणि नितीश राणा (19) यांना मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार कृणाल पांड्या आणि राहुल तेवतिया यांनाही अपेक्षित योगदान देता आले नाही.



ख्वाजा नफे आणि अब्बास आफ्रिदीची वादळी फलंदाजी


89 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर ख्वाजा नफेने 12 चेंडूंत 41 धावा, तर अब्बास आफ्रिदीने अवघ्या 8 चेंडूंत 35 धावा ठोकल्या. या दोघांनी केवळ 13 चेंडूंत 59 धावांची भागीदारी करत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. विशेष म्हणजे, टी. नटराजनच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानने 28 धावा वसूल केल्या. त्यानंतर अब्दुल समद आणि इरफान खान यांनी उर्वरित धावा पूर्ण करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 3.5 षटकांत 2 गडी गमावून 91 धावा केल्या.



भारतासाठी पुढील सामना महत्त्वाचा


स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात UAE कडून 1 विकेटने पराभूत झालेल्या पाकिस्तानने भारताविरुद्धच्या विजयामुळे 'क' गटात अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे, भारताला या पराभवामुळे गटातील आपले स्थान सुधारण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारताचा या स्पर्धेतील दुसरा आणि अखेरचा गट सामना शनिवारी, 31 ऑक्टोबर रोजी UAE विरुद्ध होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

गौतम गंभीरसाठी IPL च्या 4 संघांमध्ये मोठी चुरस; एका फ्रँचायझीसोबत चर्चा देखील सुरू!

Gautam Gambhir: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा भारतासोबतचा करार 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे, परंतु

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगचं दीड शतक, मिचेल सँटनरला केलं शिकार

[caption id="attachment_1070515" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून धडाधड विक्रम रचले गेले आहे. आतापर्यंत

IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत 'A' मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

[caption id="attachment_1070498" align="aligncenter" width="800"] भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीने एक

IND vs NZ 4th T20: वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमारला बसवलं, असा निर्णय घेण्याचं कारण की..

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. तिसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी

शुभमन गिलच्या कपाळाजवळ कोणती मशिन लावली? फायदे वाचून व्हाल आवाक्

टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय

'मला 2027 चा वर्ल्डकप खेळायचा आहे...', शुभमन गिलचं नाव घेत रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे खेळत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत