Saturday, October 31, 2026

Nashik Kumbhmela : भक्ती, श्रद्धा अन् दिव्य प्रकाशाचा संगम, गोदावरी आरतीचे विलोभनीय दृश्य

सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय पर्वात नाशिकच्या गोदावरी तीरावर आणखी एका ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. तब्बल ६ हजार २३३ जणांनी एकत्रितपणे गोदावरी आरतीचे पठण करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भक्ती, श्रद्धा आणि सनातन संस्कृतीचा अनोखा संगम घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे नाशिकचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. 1/5 नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर पार पडलेल्या या सामूहिक आरतीमध्ये हजारो भाविकांनी एकाच वेळी सहभाग घेतला. 2/5 एकसुरात झालेल्या गोदा आरतीच्या पठणाने संपूर्ण गोदावरी तीर भक्तिमय झाला. ६,२३३ जणांच्या सहभागातून साकारलेल्या या उपक्रमाने सामूहिक गोदावरी आरतीचा विश्वविक्रम नोंदवला. 3/5 सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक गोदावरी आरतीने भारतीय संस्कृतीतील सामूहिक श्रद्धा आणि भक्तीभावाचे दर्शन घडवले. हजारो भाविकांचा एकत्रित सहभाग आणि गोदावरी मातेच्या आरतीचा निनाद यामुळे हा सोहळा नाशिकच्या धार्मिक इतिहासातील महत्त्वाचा क्षण ठरला आहे. 4/5 शंखनादाच्या विश्वविक्रमानंतर गोदावरी आरतीच्या माध्यमातून नाशिकने आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद करत सिंहस्थ कुंभपर्वाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 5/5 आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक आयोजनांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत अत्यंत मंगलमय वातावरणात आज श्रीगणेशा झाला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक साधू महंत आणि नेत्यांची मांदियाळी याठिकाणी पहायला मिळाली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >