मुंबई महापालिकेच्या वीज वापराचे होणार मूल्यांकन; महापालिकेच्या वतीने होणार तांत्रिक समितीचे लवकरच गठन

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह 26 प्रशासकीय कार्यालयांमधील वीज वापराचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी टाटा पॉवर, महापारेषण आणि महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार आहे. ही समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार असून, ऊर्जा बचत, वीज खर्चात कपात आणि महापालिकेच्या वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षमतेबाबत महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार असून यासाठी विजेच्या वापराचा आढावा घेण्यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये टाटा पॉवर, महापारेषण आणि महापालिका विद्युत व यांत्रिक विभागाचे निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये असेल. ही समिती दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल महापालिकेला सादर करणार असून यामध्ये विजेचा वापरासंदर्भात काही शिफारशी तसेच महापालिकेच्यावतीने निर्मित केल्या ऊर्जा प्रकल्पांबाबतच्या शिफारशी अपेक्षित आहेत.


मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह विविध २६ प्रशासकीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये विजेचा वापर आणि ऊर्जा बचत आदींबाबत आढावा घेवून सर्वंकष अहवाल बनवण्यासाठी तांत्रिक समितीची निवड करण्याचा निर्णय यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. त्यामध्ये तज्ज्ञ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या वीज वापराच्या पद्धती, ऊर्जा बचतीची क्षमता तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या कॅप्टिव्ह वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षेत्राचा सर्वंकष निदानात्मक अहवाल या समितीकडून अपेक्षित आहे.


prahaar.in/2026/10/30/bengaluru-mumbai-vande-bharat-sleeper-train-launch-ashwini-vaishnaw-flag-off-click-here-for-all-updates/

या समितीकडून विश्लेषणाचे काम व अहवाल हे विशेष स्वरूपाचे काम केले जाईल. तसेच आवश्यक तांत्रिक कौशल्याचे आणि वेळबद्ध स्वरूपाचे असल्याने या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश या तांत्रिक समितीमध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा प्रकल्पांचा आढावा घेणे तसेच ओपन ऍक्सेसद्वारे वीज खरेदीच्या अनुषंगाने वीज खर्चाचे अनुकूलन करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या उद्देशाने ही तांत्रिक समिती गठित करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ! भाजप महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत भव्य पदयात्रेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती

मुंबईच्या श्रीगणेशोत्सवाची पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे गौरवोद्गार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा

Central Railway Megablock: मुंबईकरांचे मेगाहाल होणार! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा सविस्तर

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि सुरक्षेची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या

Diva Station Megablock: दिवा स्थानकावर विशेष ब्लॉक, दोन एक्स्प्रेसला बसणार फटका; बाकीच्या गाड्यांचं शेड्युल्ड काय?

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार आहात, तर ही

Western Railway Megablock: वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; वाचा अपडेट...

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न

Bandra News: वांद्रे रेल्वे स्थानकाची जागा अखेर मोकळी; गरीब नगरमधील 94 बांधकामांवर रेल्वेची कारवाई

मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेने शुक्रवारी 94 उर्वरित बांधकामे पाडली. मुंबई महानगर