भुवनेश्वर कुमारची क्रिकेट कारकिर्द संपली? पहिलं षटकं सोडलं तर वाईट स्थिती, न्यूझीलंडविरुद्ध असं घडलं
भारतीय संघात भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर कमबॅक केलं होतं.पण त्याचं कमबॅक काही खास झालं नाही. खरं तर हे कमबॅक शेवटासारखं झालं आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही.
November 2, 2026 05:09 PM
1/5 भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात कमबॅक केल्याने जोरदार चर्चा रंगली होती. भुवनेश्वर कुमारचं न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून कमबॅक झालं. पण या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. (Photo: ANI)
2/5 भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका खिशात घातली. पण भुवनेश्वर कुमारची कामगिरी सुमार ठरली. भुवनेश्वर कुमारने या मालिकेत पाच पैकी चार सामने खेळले. चार सामन्यात त्याने एकूण 16 षटकं टाकली. पण या 16 षटकात त्याला काही छाप सोडता आली नाही. (Photo: ANI)
3/5 भुवनेश्वर कुमारने 16 षटकं टाकली आणि 180 च्या सरासरीने आणि 11.25 च्या इकोनॉमी रेटने 180 धावा दिल्या. तसेच एकच विकेट घेण्यात यश मिळालं. या कामगिरीसह भुवनेश्वर कुमारने सर्वात खराब कामगिरीचा नवा विक्रम रचला. (Photo: ANI)
4/5 भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडच्या काइल जॅमीसनच्या नावावर असलेला नकोसा विक्रम मोडला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2021 मध्ये खेळलेल्या टी20 मालिकेत 175 च्या सरासरीने धावा दिल्या होता. आता भुवनेश्वर कुमारने 180 च्या सरासरीने धावा दिल्या. (Photo: ANI)
5/5 भुवनेश्वरने चार सामन्यात टाकलेलं पहिलं षटकं किफायतशीर ठरलं. यात त्याने 5.25 च्या सरासरीने धावा दिल्या. पण दुसऱ्या षटकात 11.25, तिसऱ्या षटकात 15.75 आणि चौथ्या षटकात 12.75 च्या सरासरीने धावा दिल्या. त्यामुळे भुवनेश्वर कुमार दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकात फेल गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. (Photo: ANI)