Monday, November 2, 2026

Amit Shah Hyderabad Rally : राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 'अराजकते'विरोधात हैदराबादमध्ये अमित शाह यांचा धडक मोर्चा; भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या नकारात्मक आणि विकासविरोधी राजकारणाचा बुरखा फाडण्यासाठी भाजपने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' या मोहिमेअंतर्गत काँग्रेसला जोरदार इशारा दिला आहे.

हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून देशातील संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे व राज्यात अराजकता पसरवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये भाजपचा भव्य मोर्चा पार पडला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या नकारात्मक आणि विकासविरोधी राजकारणाचा बुरखा फाडण्यासाठी भाजपने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' या मोहिमेअंतर्गत काँग्रेसला जोरदार इशारा दिला आहे.

राहुल गांधींच्या 'भ्र्रामक' राजकारणाला अमित शाह यांचे प्रत्युत्तर

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपने केला. या मोर्चाद्वारे अमित शाह यांनी काँग्रेसचा हा भ्रम मोडून काढला. "राहुल गांधी देशातील लोकशाही संस्थांवर अविश्वास दाखवून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी कडक टीका भाजप नेत्यांनी या वेळी केली.

तेलंगणातील काँग्रेसच्या गैरकारभाराविरुद्ध जनतेचा आक्रोश

तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून राज्यात विकास थांबला असून भ्रष्टाचाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींच्या पोकळ आश्वासनांना आणि काँग्रेसच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून हजारो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते या मोर्चात रस्त्यावर उतरले. 'काँग्रेसची अराजकता हटवा, लोकशाही वाचवा' अशा जोरदार घोषणांनी हैदराबादचा परिसर दुमदुमून गेला होता.

राहुल गांधींचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसची धडपड

मोर्चादरम्यान बोलताना भाजप वक्त्यांनी सांगितले की, "राहुल गांधी सातत्याने देशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम करत आहेत. तेलंगणातील काँग्रेस सरकार अपयशी ठरल्यामुळे आणि स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी राहुल गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवत आहेत. मात्र, तेलंगणाची जनता आता काँग्रेसच्या या दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला बळी पडणार नाही."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >