मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे महायुतीची भव्य पदयात्रा संपन्न झाली. देशविरोधी शक्तींविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
1/8 दादर येथे आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. (Photo: Facebook)
2/8 उपस्थितांना संबोधित करताना मंत्री नितेश राणे; 'ही लढाई संविधान टिकवण्यासाठी आहे' असा ठाम विचार त्यांनी यावेळी मांडला. (Photo: Facebook)
3/8 हातामध्ये महायुतीचे झेंडे आणि फलक घेऊन दादरच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने उतरलेला कार्यकर्ते आणि नागरिकांचा जनसागर. (Photo: Facebook)
4/8 पदयात्रेत सहभागी होऊन महायुतीची एकजूट दाखवताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि इतर वरिष्ठ नेते. (Photo: Facebook)
5/8 विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना. (Photo: Facebook)
6/8 महापौर रितू तावडे आणि मुंबई भाजपचे नेते अमित साटम पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना. (Photo: Facebook)
7/8 देशात अराजकता निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात एकवटलेले महायुतीचे आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख नेते. (Photo: Facebook)
8/8 दादरमधील पदयात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि महायुतीच्या शक्तीप्रदर्शनाचे विहंगम दृश्य. (Photo: Facebook)