Monday, November 2, 2026

Central Railway News: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या... मध्य रेल्वेने 'या' दोन लांबपल्ल्यांच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात केला बदल

मध्य रेल्वेकडून चेन्नई– मुंबई सीएसएमटी आणि हैदराबाद– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही सुद्धा ह्या एक्स्प्रेसने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे.

मुंबई: मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या मेल- एक्स्प्रेसबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनो जर तुम्ही, चेन्नई– मुंबई सीएसएमटी- चेन्नई एक्स्प्रेस आणि हैदराबाद– मुंबई सीएसएमटी- हैदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. मध्य रेल्वेने उद्यापासून (3 नोव्हेंबर- मंगळवार) या दोन्हीही एक्स्प्रेसच्या गाडी क्रमांकामध्ये आणि वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमका कशा पद्धतीने ह्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे, जाणून घेऊया...

मध्य रेल्वेने परिचालन कारणास्तव काही मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 22159 डाऊन आणि 22160 अप चेन्नई– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस– चेन्नई एक्स्प्रेसच्या अप प्रवासातील स्थानकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. मध्य रेल्वने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस सध्या सकाळी 06.45 ते 06.50 वाजेपर्यंत दौंड स्थानकावर थांबते. पण आता सुधारित वेळेनुसार, सकाळी 06.50 ते 06.55 वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस थांबेल. पुणे स्थानकावर सध्या ही एक्स्प्रेस सकाळी 08.10 ते 08.20 वाजेपर्यंत थांबते. पण सुधारित वेळेनुसार सकाळी 08.50 ते 9 वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस थांबेल.

खडकी स्थानकावर ही एक्स्प्रेस सकाळी 08.30 ते 08.32 वाजेपर्यंत थांबते. पण सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस सकाळी 09.10 ते 09.12 वाजेपर्यंत थांबेल. कल्याण स्थानकावर ही एक्स्प्रेस सकाळी 10.47 ते 10.50 वाजेपर्यंत थांबते. पण सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस सकाळी 11.37 ते 11.40 वाजेपर्यंत थांबेल. ठाणे स्थानकावर ही एक्स्प्रेस सकाळी 11.22 ते 11.25 वाजेपर्यंत थांबते. पण, सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर दुपारी 12 ते 12.03 वाजेपर्यंत थांबेल. दादर स्थानकावर सकाळी 11.52 ते 11.55 वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस पोहोचते, पण सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस दुपारी 12.22 ते 12.25 वाजेपर्यंत पोहोचेल. मुंबई सीएसएमटी स्थानकावर सध्या ही एक्स्प्रेस दुपारी 12.30 ला पोहोचते. पण आता सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस दुपारी 01.05 वाजता पोहोचेल.

दरम्यान, चेन्नई– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इतर स्थानकांवरील पोहोचण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नाही. एक्स्प्रेसच्या वेळेसोबतच गाडीच्या स्थितीबद्दल आणि गाडीच्या क्रमांकामध्येही बदल होणार आहे. आजपर्यंत चेन्नई– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून चालत होती, पण आता उद्यापासून ही एक्स्प्रेस मेल- एक्स्प्रेस म्हणून चालणार आहे. ह्या एक्स्प्रेसच्या तिकिटदरामध्येही बदल होण्याची शक्यता आहे. गाडी क्रमांक 22159 डाऊन आणि 22160 अप मुंबई सीएसएमटी– चेन्नई एक्सप्रेस ही 'सुपरफास्ट' श्रेणीतून 'मेल- एक्स्प्रेस' श्रेणीमध्ये धावणार आहे. 1 जानेवारी 2027 पासून ह्या एक्स्प्रेसच्या क्रमांकामध्ये बदलले करण्यात येणार आहे.

  • गाडी क्रमांक22159 मुंबई सीएसएमटी– चेन्नई एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक बदलून गाडी क्रमांक 11075 असा केला जाईल.
  • गाडी क्रमांक 22160 चेन्नई–मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक बदलून गाडी क्रमांक 11076 असा केला जाईल.

गाडी क्रमांक 22731 अप हैदराबाद– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस– हैदराबाद एक्स्प्रेसच्या अप प्रवासातील स्थानकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. मध्य रेल्वने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस सध्या सकाळी 08.55 ते 9 वाजेपर्यंत पुणे स्थानकावर थांबते. पण आता सुधारित वेळेनुसार, सकाळी 09.05 ते 09.10 वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस पुणे स्थानकावर पोहोचेल. लोणावळा स्थानकावर सध्या ही एक्स्प्रेस सकाळी 09.58 ते 10 वाजेपर्यंत थांबते. पण सुधारित वेळेनुसार सकाळी 10.28 ते 10.30 वाजेपर्यंत लोणावळा स्थानकावर पोहोचेल. सध्या कल्याण स्थानकावर ही एक्स्प्रेस सकाळी 11.47 ते 11.50 वाजेपर्यंत पोहोचते. पण सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस सकाळी 12.02 ते 12.05 वाजेपर्यंत थांबेल. दादर स्थानकावर ही एक्स्प्रेस सकाळी 12.32 ते 12.35 वाजेपर्यंत थांबते. पण सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस सकाळी 12.42 ते 12.45 वाजेपर्यंत दादर स्थानकावर थांबेल. मुंबई सीएसएमटी स्थानकावर सध्या ही एक्स्प्रेस दुपारी 01.05 ला पोहोचते. पण आता सुधारित वेळेनुसार ही एक्स्प्रेस दुपारी 01.50 वाजता पोहोचेल. दरम्यान, हैदराबाद– मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इतर स्थानकांवरील पोहोचण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >