Nursing Admission 2026: नर्सिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठा निर्णय; प्रवेशाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर

प्रवेशाची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबरवरून 15 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परिचारिका महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा होता त्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

Nursing Admission 2026:  राज्यातील विविध नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष पुन्हा एकदा शिथिल करण्यात आले असून, प्रवेशाची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशातील परिचारिका महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने भारतीय परिचर्या परिषदेने (आयएनसी) नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या तारखेनुसार प्रवेशाची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबरवरून 15 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परिचारिका महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा होता त्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, नव्याने शिथिल करण्यात आलेले पात्रता निकष नेमके किती पर्सेंटाइलपर्यंत कमी करण्यात आलेले आहेत, याबाबत परिषदेने स्पष्टता केलेली नाही.


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) देशभरातील परिचारिका महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने पात्रता निकष कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing), पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, पीएच.डी. नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि नर्स प्रॅक्टिशनर या सर्व अभ्यासक्रमांना हा निर्णय लागू आहे.



यापूर्वी 16 ऑक्टोबरला परिषदेने पात्रता निकष कमी केले होते. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 50 पर्सेंटाइलची अट 40 पर्सेंटाइलपर्यंत, तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 35 पर्सेंटाइल, तर राखीव प्रवर्गासाठी 30 पर्सेंटाइलपर्यंत कमी करण्यात आली होती. आता पुन्हा निकष शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी नव्या निकषांची निश्चित मर्यादा अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान हे निकष शून्य पर्सेंटाइलपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. शून्य पर्सेंटाईल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रिक्त जागांवर प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र, इतर तांत्रिक व शैक्षणिक अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. (Nursing Admission 2026: )


दरम्यान, महाविद्यालयांना मंजूर वार्षिक प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. तसेच 15 नोव्हेंबरनंतर प्रवेशाची मुदतवाढ देखील होणार नसल्याचे सांगण्यात आले असून, अंतिम तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. जर कोणत्याही महाविद्यालयाने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भारतीय परिचर्या परिषदेने दिला आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : "राहुल बाबा, परदेशात फिरून निवडणुका नाही जिंकता येत; देशात येऊन घाम गाळावा लागतो!" अमित शाह यांची राहुल गांधींवर टीका

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी हैदराबादमध्ये भाजपच्या 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ'

दिल्लीतील रॅलीत बोलूही न देणाऱ्या राहुल गांधींची किती काळ गुलामी करणार? भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: दिल्ली येथे 'इंडिया' आघाडीने काढलेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या उबाठा आणि राष्ट्रवादी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24 योजनांचा लाभ आता ऑनलाइन; मंत्री नितेश राणेंचे आवाहन

राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी 2.0 (https://mahadbt2.maharashtra.gov.in/)

Amit Shah Hyderabad Rally : राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 'अराजकते'विरोधात हैदराबादमध्ये अमित शाह यांचा धडक मोर्चा; भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून देशातील संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे व

मुंबईसह महाराष्ट्रातून ‘घाण’ साफ करायची असेल, तर हिंदूंना एकत्र यावेच लागेल! - मंत्री नितेश राणे

मुंबई : बांगलादेशी, रोहिंग्यांसह सर्व ‘घाण’ मुंबई आणि महाराष्ट्रातून साफ करायची असेल, तर हिंदूंनी एकत्र येणे

Mumbai Bengaluru Vande Bharat Express: CCTV, लॉक दरवाजे अन् स्वच्छ टॉयलेट! ट्रॅव्हल क्रिएटरने सांगितला अनुभव

नवीन बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस केवळ तिच्या वेग आणि आधुनिक रुपामुळेच नाही तर इतरही कारणांमुळे