
टेक्सासहून बहामासकडे जात होते विमान
मिळालेल्या माहितीनुसार, N722BD या नोंदणी क्रमांकाचे हे विमान LR60271 LLC या कंपनीद्वारे चालवले जात होते. विमानाने टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. ते बहामासमधील नॉर्थ एल्युथेरा विमानतळाकडे जात होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे 12:50 वाजता मिलिटरी ट्रेलजवळील एका मोबाइल होम कम्युनिटीच्या परिसरात विमान कोसळले. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, विमान सुमारे 35,000 फूट उंचीवरून अचानक वेगाने खाली येत होते. मात्र, विमानाचा वेगाने खाली येण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.धडकेनंतर भीषण आग; घरांचेही नुकसान
विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि परिसरात आग पसरली. धडकेमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला, तर विमानाचे अवशेष परिसरात विखुरले गेले. या दुर्घटनेत एका मोबाइल होमचे नुकसान झाले. तसेच वीजवाहिन्या तुटल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे.सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये विमान वेगाने जमिनीकडे येताना आणि धडकेनंतर आगीचा मोठा लोळ उठताना दिसत आहे. काही डॅशकॅम फुटेजमध्ये अपघाताचा क्षण कैद झाला आहे. घटनास्थळावरून दाट काळा धूर उठत असल्याचेही व्हिडिओंमध्ये दिसते.WATCH: New video shows Learjet 60 business jet crashing near West Palm Beach, Florida.
The plane was completely disintegrated upon impact. Number of casualties unknown. https://t.co/l5JT9KEWnQ — BNO News (@BNONews) November 1, 2026




