Tu Mil Jaaye Song: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'किंग' चित्रपटातलं 'तू मिल जाए' गाणं रिलीज

शाहरूख खानच्या मोस्ट अवेटेड 'किंग' चित्रपटातील पहिलं वहिलं रोमँटिक आणि ॲक्शन साँग रिलीज झालेलं आहे. 'तू मिल जाए' असं या गाण्याचं नाव असून शाहरूख आणि दीपिकाच्या अफलातून फ्यूजनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरूख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या अपकमिंग चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आलं आहे. निर्मात्यांनी 'किंग' चित्रपटातील 'तू मिल जाए' हे गाणं रिलीज केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅन्समध्ये, म्युझिक इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध सिंगर, एड शीरन आणि अरिजीत सिंग गाणं रिलीज करणार असल्याची चर्चा होती. अखेर तो क्षण आज आला. एड शीरन आणि अरिजीत सिंगने शाहरूख खानच्या चित्रपटातील 'किंग' चित्रपटातील 'तू मिल जाए' हे पहिलं गाणं रिलीज केलं आहे.



'तू मिल जाए' हे गाणं प्रसिद्ध ब्रिटीश सिंगर एड शीरन, प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंग आणि मधुबंती बागची हिने गायले आहे. या गाण्याला संगीत सचिन- जीगर या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. रोमँटिक आणि ॲक्शन असलेल्या ह्या गाण्याने अवघ्या काही तासातच चाहत्यांचे मन जिंकले. शाहरूख खान सोबत दीपिका पादुकोणनेही चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर केलेली आहे. चित्रपटातील या पहिल्या- वहिल्या गाण्यनेच सोशल मीडियावर सर्वांचेच मन जिंकले. सध्या सोशल मीडियावर हे गाणं कमालीचं ट्रेंड होताना दिसत आहे. 'ओम शांती ओम', 'हॅप्पी न्यू इयर', 'पठाण' आणि 'जवान' सह अनेक चित्रपटांमध्ये शाहरूख आणि दीपिकाने एकत्रित स्क्रीन शेअर केलेली आहे. या सर्व सुपर डुपर हिट चित्रपटांनंतर आता पुन्हा एकदा 'किंग' चित्रपटातून सुद्धा ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.


 


'तू मिल जाए' गाण्याबद्दल बोलायचे तर, किंग खानच्या फिटनेसमुळे गाण्याला चार चाँद लागले आहेत. गाण्यामध्ये शाहरूख आणि दीपिकाने केलेल्या रोमान्समुळे आणि जबरदस्त ॲक्शनमुळे पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 'पठाण'मधील 'बेशरम रंग' गाण्यामध्ये केलेल्या अफलातून केमिस्ट्रीनंतर पुन्हा एकदा आता 'किंग' चित्रपटातील 'तू मिल जाए' गाण्यातील अफलातून केमिस्ट्रीची चर्चा होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ह्या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत असून चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या टीझरची, इतरत्र गाण्यांची आणि ट्रेलरची प्रचंड उत्सुकता आहे.



चित्रपटाविषयी सांगायचे तर, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, 'किंग' चित्रपट 2026च्या अखेरीस रिलीज होणार आहे. 24 डिसेंबरला हा चित्रपट भारतासह जगभरामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणसोबत शाहरूखची लेक अभिषेक बच्चन, अनिल कपूर, सुहाना खान, राणी मुखर्जी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि अभय वर्मा अशी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे. गौरी खान, सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून यशराज फिल्म्स स्टुडिओ आणि पेन स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

Shah Rukh Khan @61 : 'बाझिगर' ते 'जवान'... बॉलिवूडच्या 'किंग खान'चे ९ आयकॉनिक चित्रपट, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' आणि जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान आज

Anuj Thakur Death: लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूरचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन

Anuj Thakur Death: टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. 'बंधन

रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 800 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट

वयाच्या 75 व्या वर्षी सुपरस्टार रजनीकांत यांनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कलाकाराने तमिळ चित्रपटसृष्टीला 800

Nora Fatehi : नोरा फतेही खानच्या अडचणींत वाढ; अभिनेत्रीचे वर्तन अयोग्य असल्याचे न्यायालयाचा आरोप

Nora Fatehi : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात २

Rupali Bhosale : लग्नाच्या 7 वर्षांनंतर संसार मोडला, आज फक्त ‘या’ व्यक्तीसाठी अविवाहित आहे रुपाली भोसले, म्हणाली…

Rupali Bhosale : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Janhvi Kapoor: हॅलोविनला जान्हवी कपूरचा 'नगिना' अवतार! आई श्रीदेवींच्या आयकॉनिक लूकला खास मानवंदना

या वर्षीच्या हॅलोविनला बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या आई आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी