बांगलादेशात उद्रेक! 500 कारखाने बंद, संतप्त वस्त्रोद्योग कामगारांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग कामगारांनी उग्र आंदोलन केलं. वस्त्रोद्योग कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले. कामगारांनी यासाठी आवामी लीगला जबाबदार धरलं आहे.

बांगलादेश गेल्या काही वर्षात अशांत असून त्याची धग पुन्हा एकदा दिसून आली. जवळपास 28 महिन्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर जाळपोळ आणि दगडफेकीचं चित्र दिसलं.वस्त्रोद्योग कामगारांनी कमी वेतनाचा मुद्दा पकडून सरकारवर दबाव आणला आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी या आंदोलनाला सुरूवात झाली आणि त्याची धग अजूनही कायम आहे. या उग्र आंदोलनामुळे काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात पोलीस चौक्या, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. पण हिंसक आंदोलकांनी आपली मागणी जोरकसपणे मांडत ढाका, आशुलिया, सावर आणि गाझीपूर यासारख्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अडवले. तसेच कपड्याचे कारखाने बंद पाडले. या आंदोलन आणि संपामुळे अंदाजे 529 कारखाने आणि जवळपास 10 लाख कामगारांवर परिणाम झाला आहे.

वेतन निश्चितीसाठी मंडळाची स्थापना


बांगलादेश सरकारने रविवारी सहा सदस्यांचे वेतन मंडळ स्थापन केलं आहे. या मंडळाचे काम वस्त्रोद्योग कारखान्यातील कामगारांचे नवीन किमान वेतन निश्चित करणे आहे. दुसरीकडे, या मंडळाच्या स्थापनेने कामगारांच्या समस्या सुटणार नाहीत, असं कामगार नेत्यांचे म्हणणं आहे. कमी वेतन, कामाची वाईट परिस्थिती, वेतनवाढीची मागणी आणि कारखान्यांचे संप यांसारख्या समस्या सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आवामी लीगशी संबंधित काही कारखानदार वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण करत आहेत, असा आरोप केला जात आहे.


बांगलादेशमधील कामगारांची काय स्थिती?


आंदोलक 30 हजार टाका मासिक वेतनाची मागणी करत आहेत. सध्याच्या पगाराच्या दुप्पट ही मागणी केली जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम 23 हजार रुपये इतकी होता. सध्या बांगलादेशातील कामगारांना दरमहा सुमारे 13 हजार टाका मिळतात. वस्त्रोद्योग हा बांगलादेशातील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशातील सर्वात मोठ्या निर्यात उद्योगापैकी एक असून परकीय चलनाचा मुख्य स्रोत आहे. युरोप अमेरिकेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बांगलादेशातील कपड्यांना मोठी मागणीआहे. त्यामुळे या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळतो.
Comments
Add Comment

India Vietnam Relations : भारत-व्हिएतनाम धोरणात्मक भागीदारीला नवी गती; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हनोई दौऱ्यात संरक्षण सहकार्यावर विशेष भर

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) सध्या व्हिएतनामच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या

Benjamin Netanyahu : इराणवर नव्याने हल्ले करण्यासाठी नेतान्याहूंचा ट्रम्प यांच्यावर दबाव; मध्यावधी निवडणुकांनंतर लष्करी कारवाईची मागणी

Benjamin Netanyahu : अमेरिका आणि इराण यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओंच्या विधानाने खळबळ

वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद आणि दहशतवादी हल्ल्यांवरून तणाव वाढत असतानाच

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त? IAEA प्रमुखांच्या एका विधानामुळे उडाली खळबळ!

आल्बनी: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

Spain Train Accident : स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात : दोन हाय-स्पीड ट्रेनच्या धडकेत ४६ जणांचा मृत्यू; माद्रिद-अंदालुसिया रेल्वे सेवा ठप्प!

माद्रिद : स्पेनच्या मध्यवर्ती भागात एका अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटनेत किमान ४६ लोकांचा मृत्यू झाल्याची अतिशय