Tuesday, November 3, 2026

Pune Crime: 5 तोळे सोन्याची मागणी, मारहाणीचे आरोप; पुण्यात 29 वर्षीय सुनेचा संशयास्पद मृत्यू

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ लावणारी घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित उद्योजकाच्या २९ वर्षीय सुनेने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. पायल झांबरे असे या तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ लावणारी घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित उद्योजकाच्या २९ वर्षीय सुनेने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. पायल झांबरे असे या तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाचे गंभीर खुलासे समोर येत आहेत.

पायलचे सासू-सासरे हे पुण्यात प्रतिष्ठित असून मुकुंदनगर भागात 'झांबरे पॅलेस' नावाचा त्यांचा मोठा बँक्वेट हॉल आहे. मृत्यूपूर्वी काही काळ आधी पायल आपल्या खेड शिवापूर येथील माहेरी गेली होती. तिच्या भावाच्या विवाहासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून संपूर्ण कुटुंब बारामतीला गेले होते. या कार्यक्रमात सर्वजण सहभागी झाले असले, तरी पायल दिवसभर प्रचंड अस्वस्थ आणि शांत दिसत होती. घरच्यांनी विचारणा केल्यानंतर बहिणीची अवस्था पाहून भावाने तिला कारण विचारले, आणि त्यानंतर पायलने आपल्या अश्रूंचा बांध सोडून सासरच्या अत्याचाराचा पाढा वाचला.

भावाला दिलेल्या जबाबात पायलने सांगितले की, तिचा पती, नणंद आणि विशेषतः सासू-सासरे तिला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते. सासू येता-जाता विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करायची, तर सासरे दारूच्या नशेत येऊन अत्यंत अयोग्य आणि गलिच्छ शिवीगाळ करत असत. याशिवाय, येत्या दिवाळीसाठी सासरच्या मंडळींनी पाच तोळे सोन्याची मागणी केली होती, ज्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. हे सर्व ऐकून भावाने तिला जिद्दीला पेटून सासरी न जाता आणखी काही दिवस माहेरीच थांबण्याचा आग्रह केला होता.

परंतु, पोटची तीन वर्षांची मुलगी आध्या सासरी एकटीच असल्यामुळे पायलने घरी परतण्याचा निर्णय घेतला. 'तिची शाळा झाली की मी पुन्हा माहेरी येईन,' असे सांगून रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती कॅबने सासरी मुकुंदनगरला परतली. मात्र, सासरी पोहोचल्यानंतर अवघ्या अडीच तासांतच म्हणजेच रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी तिने भावाला एक काळीज पिळवटून टाकणारा मेसेज पाठवला. यामध्ये तिने स्पष्टपणे 'माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे,' असे लिहून आपला मोबाईल बंद केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह सासरच्या मालकीच्या जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. जर पायलने त्या दिवशी भावाचा सल्ला मानून आणखी दोन दिवस माहेरीच मुक्काम केला असता, तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, अशी हळहळ आता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >