Tuesday, November 3, 2026

Pune Metro Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे मेट्रोशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन केले, तसेच काही नवीन मार्गांच्या कामाची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadanvis)  यांची विशेष उपस्थिती होती. या नव्या मेट्रो प्रकल्पांमुळे पुण्याच्या कानाकोपऱ्यात जाणे सहज शक्य होणार असून, रस्त्यांवरील गाड्यांचा ताण आणि ट्रॅफिक कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि प्रवास अधिक जलद बनवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे मेट्रोशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन केले, तसेच काही नवीन मार्गांच्या कामाची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis)  यांची विशेष उपस्थिती होती. या नव्या मेट्रो प्रकल्पांमुळे पुण्याच्या कानाकोपऱ्यात जाणे सहज शक्य होणार असून, रस्त्यांवरील गाड्यांचा ताण आणि ट्रॅफिक कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

मेट्रो वेळापत्रक आणि फेऱ्या

4 नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी 6 वाजता सुरू होईल. पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयासाठी शेवटची ट्रेन रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालयावरून माणकडे रात्री ११.४० वाजता शेवटची गाडी सुटेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-१ व लाईन-२ शी थेट इंटरचेंज जोडणी देण्यात आली असून, प्रवाशांसाठी संयुक्त अॅप आणि ‘एनसीएमसी’ कार्डची सोय असेल.

पहिल्या टप्प्यात 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली

या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीला 17 स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. यापैकी 10 स्थानकांवर दोन्ही जिने खुले असतील. माण, हिंजवडी फेज-2 सर्कल-1, पद्मभूषण चौक, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांवर सुरुवातीला एकच जिना खुला ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 6 स्थानके आवश्यक कामे आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होतील.

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा (Phase-2) श्रीगणेशा

या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या 'फेज-२' (दुसरा टप्पा) या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा पाया रचण्यात आला. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. यामुळे येत्या काही वर्षांत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत वेगाने, कमी खर्चात आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करता येणार आहे.

पर्यावरणपूरक 'ग्रीन मेट्रो': ३०% वीज स्वतःच तयार करणार!

या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांसाठी एक अत्यंत अभिमानास्पद माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे मेट्रो ही पर्यावरणाचा समतोल राखणारी 'ग्रीन मेट्रो' म्हणून काम करणार आहे. मेट्रोला लागणाऱ्या एकूण विजेपैकी तब्बल ३० टक्के वीज ही मेट्रो स्वतःच तयार करणार आहे. ही पर्यावरणपूरक दृष्टीने खूप मोठी आणि कौतुकास्पद बाब आहे. तसेच, पुण्यातील मेट्रो प्रकल्प वेगवेगळ्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >