Central Railway: मध्य रेल्वेची दिवाळी भेट; मुंबई-नागपूर मार्गावर धावणार अतिरिक्त विशेष गाड्या

दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर मार्गावर धावणार अतिरिक्त विशेष गाड्या

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे सणाच्या काळात मायदेशी जाणाऱ्या आणि परतणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


 नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – नागपूर विशेष ट्रेन (८ फेऱ्या)




  • गाडी क्र. ०१०८३ (LTT ते नागपूर): ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६, ८, ११ आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी १७.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

  • गाडी क्र. ०१०८४ (नागपूर ते LTT): ही गाडी नागपूर येथून ५, ७, १० आणि १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.


प्रमुख थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.


कोच रचना: ४ एसी २-टायर, ८ एसी ३-टायर, ६ स्लीपर क्लास आणि २ जनरल सेकंड क्लाससह गार्ड्स ब्रेक व्हॅन.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – नागपूर – CSMT विशेष ट्रेन (४ फेऱ्या)




  • गाडी क्र. ०१०८५ (CSMT ते नागपूर): ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ७ आणि ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

  • गाडी क्र. ०१०८६ (नागपूर ते CSMT): ही गाडी नागपूर येथून ८ आणि १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.२५ वाजता CSMT येथे पोहोचेल.



प्रमुख थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.



कोच रचना: २ एसी २-टायर, ६ एसी ३-टायर, ४ स्लीपर क्लास, २ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास सीटिंगसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.


या विशेष गाड्यांचे बुकिंग (विशेष शुल्कासह) ४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. प्रवासी सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर (PRS) तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.irctc.co.in) आपली तिकिटे बुक करू शकतात. सामान्य डब्यांसाठीची अनारक्षित तिकिटे 'UTS' प्रणालीद्वारे किंवा 'RailOne' ॲपवरून सामान्य दराने घेता येतील. प्रवाशांनी स्थानकांवरील गाड्यांच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 'NTES' मोबाइल ॲपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA सक्रिय, मुंबईतून 22 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त; अनेक दुकानांचे परवाने केले निलंबित

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर धडक कारवाई केली आहे. FDA ने मुंबई,

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

Pune Crime: 5 तोळे सोन्याची मागणी, मारहाणीचे आरोप; पुण्यात 29 वर्षीय सुनेचा संशयास्पद मृत्यू

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ लावणारी घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित

कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारणार; मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे बळ

मुंबई : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीत बाधित नागरिकांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल

Devendra Fadnavis: टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी फडणवीस सरकारचा मोठा पुढाकार; राज्यात 300 अत्याधुनिक टूनॅट यंत्रे बसविणार

मुंबई: महाराष्ट्राला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून

Vande Bharat Express: कोकणवासीयांची महत्त्वाची इच्छा पूर्ण, मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 16 डब्ब्यांनी धावणार

[caption id="attachment_970683" align="aligncenter" width="650"] कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल