Devendra Fadnavis: टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी फडणवीस सरकारचा मोठा पुढाकार; राज्यात 300 अत्याधुनिक टूनॅट यंत्रे बसविणार

महाराष्ट्राला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभरात 300 अत्याधुनिक ‘टूनॅट क्वात्रो’ आण्विक निदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

मुंबई: महाराष्ट्राला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभरात 300 अत्याधुनिक ‘टूनॅट क्वात्रो’ आण्विक निदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना जलद, अचूक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरीय आरोग्य संस्थांमध्ये ही यंत्रे बसविण्याची योजना आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या या तंत्रज्ञानामुळे क्षयरोगाचे निदान अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येणार आहे.


या प्रकल्पासाठी सुमारे 41.92 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याची अंमलबजावणी 21 महिन्यांत केली जाणार आहे. यासाठी बीपीसीएल फाउंडेशन, एचआयटीईएस–एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड आणि आरोग्य सेवा संचालनालयातील क्षयरोग व कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.



‘टूनॅट क्वात्रो’ यंत्रांच्या माध्यमातून अवघ्या एका तासात क्षयरोगासह रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करणे आता शक्य होणार आहे. ही यंत्रे पोर्टेबल असून बॅटरीवर चालवण्यात येत आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या मर्यादा असलेल्या दुर्गम भागांतही त्यांचा प्रभावी वापर करता येणार आहे. यंत्रांच्या संचालनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, निक्षय डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे.


या प्रकल्पामुळे राज्यात दरवर्षी सुमारे 9 लाख 36 हजार क्षयरोग तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. परिणामी, अंदाजे 1 लाख क्षयरुग्ण आणि 4 हजार 680 रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्णांचे लवकर निदान होण्यास मदत होईल. क्षयरोगाचे वेळेत निदान झाल्यामुळे उपचार लवकर सुरू करता येतील आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासही मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांना आधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्राला टीबीमुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat Express: कोकणवासीयांची महत्त्वाची इच्छा पूर्ण, मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 16 डब्ब्यांनी धावणार

[caption id="attachment_970683" align="aligncenter" width="650"] कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल

Pune Metro Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि प्रवास अधिक जलद बनवण्यासाठी एक मोठा निर्णय

Sangli : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर

Maharashtra Weather: राज्यात अवकाळी पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून कोकण अन् विदर्भाला इशारा

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल

केंद्र सरकारकडून पुणेकरांना दिवाळी गिफ्ट, 21,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (3 नोव्हेंबर- मंगळवार) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास, व्हिडिओ

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मृद व जलसंधारण कामांसाठी समितीची स्थापना

मुंबई: राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. राज्य सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर