
Nashik Crime : जुन्या सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने कोयत्याने एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती-पत्नीसह त्यांचा १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी श्रावण राबडे याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं ?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी चौकात रस्त्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी श्रावण राबडे याने काहीतरी कारण काढून निकम कुटुंबीयांशी वाद घातला. त्यानंतर त्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संदीप निकम (वय ५०) आणि त्यांचा मुलगा अर्णव निकम (वय १७) यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
Nashik Crime : वाहतूक पोलीस असल्याचे भासवून वाहनचालकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या एका इसमाचा प्रकार पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला आहे. स्वतःकडे कोणताही ...
अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, पती आणि मुलाला वाचवण्यासाठी मानसी निकम या धावून गेल्या असता आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मानसी निकम यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी श्रावण राबडे याला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत.





