Tuesday, November 3, 2026

Jesus De Miguel Death: सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, उपचारादरम्यान 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

टेनेरिफ संघाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू जीसझ डी मिगेल याचं निधन झालं आहे. निधनामुळे त्याचे जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले आहेत.

मुंबई: क्रिडा जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटूचं निधन झालं आहे. टेनेरिफ संघाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू जीसझ डी मिगेल याचं निधन झालं आहे. फुटबॉल सामना दरम्यान, झालेल्या एका भीषण घटनेमध्ये 30 वर्षीय फुटबॉलपटूला आमला जीव गमवावा लागला आहे. या भीषण घटनेमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्पेनमधील एका फुटबॉल सामनादरम्यान जीसझ मिगेलची एका गोलकिपरसोबत जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये, जीसझ गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच जखमी अवस्थेमध्ये रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच जीसझ मिगेलची प्राणज्योत मालवली.

जीसझ मिगेलने मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे त्याचे जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले आहे. जीसझ मिगेलच्या अचानक एक्झिटमुळे फुटबॉल विश्वामध्ये केव्हाही पोकळी भरून न काढणारी आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्पेनमध्ये सध्या फुटबॉल मॅच सुरू आहे. आज सीडी टेनरिफ विरूद्ध एफसी अँडोरा या दोन संघांमध्ये फुटबॉलची मॅच होती. सामना अंतिम क्षणामध्ये होता. त्यावेळी सामना 2-2 अशा बरोबरीने सुरू होता. मैदानामध्ये, जीसझ डी मिगेल खेळत होता. तो फुटबॉल पुढे घेऊन चालला होता. तितक्यात समोरून एफसी अँडोरा टीमचा गोलकीपर जीसझ ओव्होना वेगाने धावत आला. तो बॉल अडवण्यासाठी जीसझ ओव्होना गोलपोस्ट सोडून मैदानाच्या मध्यभागी धावत आला. त्याच दरम्यान, जीसझ ओव्होनाची आणि जीसझ मिगेलची जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये जीसझ मिगेल गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्यामुळे तो थेट भर मैदानातच खाली पडला. खाली पडल्यामुळे सर्व खेळाडू त्याच्या मदतीला धावून आले.

त्याला लगेचच जवळच्या रूग्णालयामध्ये नेण्यात आले. त्या दरम्यान जीसझ मिगेलला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांना पुन्हा त्याचं हृदय सुरू करण्यास यश सुद्धा आल्याची माहिती स्पॅनिश माध्यमांनी प्रसारित केली. पण त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची अचानक प्रकृती खालावली आणि मंगळवारी सकाळी 8 वाजता जीसझ मिगेलची प्राणज्योत मालवली. टेनरिफ क्लबने अधिकृत निवेदन सादर करत जीसझ मिगेलच्या जगभरातील चाहत्यांना ही दु:खद बातमी शेअर केली आहे. जीसझ मिगेलच्या कुटुंबीयांसह त्याचे मित्र मंडळी आणि त्याचा चाहतावर्गावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेमुळे काही काळ मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. रेफ्रीने एफसी अँडोराचा गोलकीपर जीसझ ओवोनोला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले आणि तो संपूर्ण सामनाच रद्द करण्यात आला.

जीसझ मिगेलच्या अचानक एक्झिटने स्पेनमधील फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी केव्हाही न भरून निघणारी असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंकडून दिली जात आहे. स्पेनमधील अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी मिगेलच्या निधनावर शोकव्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >