पुणे: पुणेकरांची बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा अखेर सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या मेट्रो मार्गिकेचे ऑनलाइन उद्घाटन होणार असून, 4 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नियमित प्रवासी सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात माण-हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान ‘पुणेरी मेट्रो’ची पिंक लाईन प्रवाशांसाठी खुली होणार आहे. त्यामुळे हिंजवडी, वाकड, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सोमवारी सामान्य नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानमधील कराची येथे ...
पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ही मेट्रो महत्त्वाची भर ठरणार आहे. 23.3 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी ऑनलाइन पद्धतीने करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण 2017 अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डीबीएफओटी पद्धतीने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. टाटा आणि सीमेन्स यांच्या संयुक्त सहभागातून स्थापन झालेल्या पीआयटीसीएमआरएल कंपनीने सुमारे 8,313 कोटी रुपये खर्चून हा मार्ग विकसित केला आहे.
Pune Metro Pink Line:
Maan ➡️ District Court
A new era of connected, inclusive, sustainable Pune!
New Line. New Stops. A New Pune! A Faster, Smarter and More Connected City for Every Punekar.
With the inauguration of the ₹8300 crore Pune Metro Pink Line by Hon PM Narendra Modi Ji, the city takes a major leap in urban mobility. Spanning 23 km between Maan and District Court, this corridor connects Hinjewadi’s IT hub with Shivajinagar, making everyday commutes easier for thousands.
What makes this milestone even more special is its women-led operations, reflecting the growing role of women in shaping and driving India’s infrastructure journey.
A proud step towards modern mobility and a Viksit Bharat!
@narendramodi @metrorailpune
#Maharashtra #PuneMetro #MetroConnectivity #SmartPune
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 2, 2026
पहिल्या टप्प्यात 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली
या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीला 17 स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. यापैकी 10 स्थानकांवर दोन्ही जिने खुले असतील. माण, हिंजवडी फेज-2 सर्कल-1, पद्मभूषण चौक, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांवर सुरुवातीला एकच जिना खुला ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 6 स्थानके आवश्यक कामे आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होतील.
पुणेरी मेट्रोचे तिकीट दर किती?
पीएमआरडीएने अंतरानुसार मेट्रोचे भाडे निश्चित केले आहे. प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार 12 ते 62 रुपये तिकीट दर मोजावे लागतील.
- 0 ते 2 किमी – 12 रुपये
- 2 ते 4 किमी – 25 रुपये
- 4 ते 8 किमी – 37 रुपये
- 8 ते 12 किमी – 43 रुपये
- 12 ते 18 किमी – 49 रुपये
- 18 किमीपेक्षा अधिक – 62 रुपये
महामेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गिकांच्या तुलनेत पुणेरी मेट्रोचे भाडे काहीसे जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
मेट्रोचे वेळापत्रक काय असेल?
4 नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी 6 वाजता सुरू होईल. गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी, तर इतर वेळेत दर 12 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल.
माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता सुटेल. तर जिल्हा न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने शेवटची फेरी रात्री 11.40 वाजता असेल.
जिल्हा न्यायालय स्थानकावर इंटरचेंजची सुविधा
जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-1 आणि लाईन-2 सोबत थेट इंटरचेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाणे सोपे होणार आहे. याशिवाय प्रवाशांसाठी संयुक्त मोबाइल ॲप आणि एनसीएमसी कार्डची सुविधाही उपलब्ध असेल.