Cyber Crime : अरे बापरे...! सेंट्रल बँकेच्या खात्यातून थेट 13.96 कोटी रुपये गायब; नेमकं प्रकरण काय?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील ट्रेझरी खात्यातून तब्बल 13.96 कोटी रुपये RTGS व्यवहारांद्वारे अनधिकृतपणे विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले.

Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता थेट बँकेच्या खात्यातून कोट्यवधी रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील ट्रेझरी खात्यातून तब्बल 13.96 कोटी रुपये RTGS व्यवहारांद्वारे अनधिकृतपणे विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मेहुल सिमारिया (वय 49) याला अटक केली आहे.



187 अनधिकृत व्यवहारांद्वारे 13.96 कोटी रुपये वळवले


मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 15 आणि 17 तारखेला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी खात्यातून संशयास्पद RTGS व्यवहार करण्यात आले. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेच्या सुरक्षित कम्युनिकेशन चॅनेलमधून RBI च्या पेमेंट प्रोसेसिंग सिस्टीमकडे पाठवल्या जाणाऱ्या व्यवहार प्रक्रियेत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे.


या कथित छेडछाडीमुळे 187 अनधिकृत व्यवहारांद्वारे 13.96 कोटी रुपये खात्यातून डेबिट झाले. अवघ्या तीन दिवसांत ही रक्कम देशभरातील 36 वेगवेगळ्या बँकांमधील 107 लाभार्थी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.



आरोपीच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा


या प्रकरणाचा तपास करताना मेहुल सिमारिया याची भूमिका समोर आली. फसवणुकीतील सुमारे 1 कोटी रुपयांची रक्कम इतर खात्यांमध्ये वळवण्यापूर्वी आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली.



कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?


या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाच्या मुंबईतील नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 318(3), 318(4) आणि 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 43, 66 आणि 66(D) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


बँकेच्या सुरक्षित व्यवहार प्रणालीत कथितरीत्या छेडछाड करून एवढी मोठी रक्कम वळवण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पैशांचा पुढील प्रवास आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Info Edge Diwali Gift : मागच्या वर्षीची 'हिरवी बॅग' आठवतेय ? जाणून घ्या, 'इन्फोएज' कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांना काय दिलं दिवाळी गिफ्ट!

नवी दिल्ली : दिवाळी आली की, प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काय भेटवस्तू (दिवाळी गिफ्ट) देणार याची मोठी

Bollywood News : '5 कोटी दे नाहीतर....' अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका

Indian ship attacked in Oman sea : ओमानच्या समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हवाई हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १३ जण सुखरूप

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर अचानक हवाई हल्ला झाल्याची अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे.

CRPF Historic Record: ऐतिहासिक विक्रम! १२ महिन्यांत एकही जवान शहीद नाही; सीआरपीएफच्या इतिहासात सुमारे ४७ वर्षांनंतरचा विक्रम

CRPF Historic Record : केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच (सीआरपीएफने) आपल्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मागील

Murasu Cyclone Alert : 'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा इशारा!

बंगालच्या उपसागरात घोंघावणारे 'मुरासू' (Murasu) हे चक्रीवादळ आता अधिकच भीषण रूप धारण करत असून, वेगाने किनारपट्टीच्या

Tiger Shroff News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने २२ वर्षीय महिलेला अटक केली; आरोपींच्या संख्येत वाढ

Tiger Shroff News : मुंबई क्राईम ब्रँचने बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात हरियाणातील कर्नाल येथून सुनेहा