District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँक निवडणूक : मतमोजणी पूर्ण, अंतिम निकाल जाहीर

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बाजी मारली आहे.

Satara District Bank : महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, या निकालांकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकांवरील वर्चस्व मिळवण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला विजय मिळाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बाजी मारली आहे.




शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना धक्का


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे.


देसाई यांच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. या निकालामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण सोसायटीत शंभुराज देसाई यांना 42 वर्षांनी विजय मिळाला आहे.


सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत जयकुमार गोरे यांनीही बाजी मारली. माण सोसायटी गटातून जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला. जयकुमार गोरे यांना 53 मतं मिळाली.



सांगली जिल्ह्यांतील निकाल


सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवलाय. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांना 54 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांना 34 मतं मिळाली आहेत. तब्बल 20 मतांनी पडळकरांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत दमदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी एकच जल्लोष केला















Comments
Add Comment

Indian Navy : अरबी समुद्रात भारतीय नौदलाची मोठी बचाव मोहीम; सोमाली चाच्यांच्या तावडीतून 20 खलाशांची सुटका

Indian Navy : अरबी समुद्रात भारतीय नौदलाने मोठी बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सोमाली समुद्री चाच्यांनी

Pune Metro : पुणेरी मेट्रो आजपासून सेवेत; 17 स्थानकांवरून धावणार, जाणून घ्या तिकीट दर आणि वेळापत्रक

पुणे: पुणेकरांची बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा अखेर सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Panchkula school attack case : पंचकुला हल्ला प्रकरणाला नवे वळण ! चिमुरडीच्या काकांनी सांगितली घटनेमागची धक्कादायक माहिती

पंचकुला : हरियाणातील पंचकुला येथील शाळेत एका चिमुरडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तिच्या काकांनी नवीन

Strait of Hormuz : ट्रम्प यांच्या युद्ध टाळण्याच्या दाव्यानंतरही अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला; गुप्त लष्करी कारवायांची माहिती समोर

International News: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या

Nashik Municipal Corporation : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छतेचा ध्यास, 80 कर्मचारी तैनात करणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात

Pune Crime News : पुण्यात आणखी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पती ताब्यात, झांबरे पॅलेसची तोडफोड, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News: पुण्यात 29 वर्षीय विवाहित आयटी इंजिनिअर पायल पवार-झांबरे यांचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत