विराट-अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा गोलंदाज! फक्त 2 विकेट्स घेत अंशुलने कसा हिसकावला सामनावीरचा किताब?

भारताने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहलीच्या 75 धावा आणि अर्शदीप सिंगच्या 4 विकेट महत्त्वाच्या ठरल्या. असं असूनही 2 विकेट घेणाऱ्या अंशुल कंबोजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कसं काय ते समजून घ्या

1/5 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगची खेळी महत्त्वाची ठरली. पण सामनावीराचा पुरस्कार अंशुल कंबोजला मिळाला. (Photo: ANI)

2/5 विराट कोहलीने 51 चेंडूत 74 धावांची खेळी, तर अर्शदीप सिंगने 4 विकेट घेतल्या. पण या सामन्यात दोन विकेट घेणाऱ्या अंशुल कंबोजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन विकेटसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. (Photo: BCCI Twitter)

3/5 अंशुल कंबोजला सामनावीराचा पुरस्कार मिळण्याचं कारण म्हणजे किफायतशीर गोलंदाजी... अंशुल कंबोजने 10 षटकात 22 धावा देत 2 विकेट काढल्या. इतकंच काय तर त्याने 46 चेंडूत एकही धाव दिली नाही. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo: BCCI Twitter)

4/5 अंशुल कंबोजने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण पहिल्याच सामन्यात 82 धावा दिल्या होत्या. त्याला आणखी एक संधी देण्यात आली आणि त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. (Photo: ANI)

5/5 अंशुल कंबोज हा फक्त दोन बळी घेऊन सामनावीर म्हणून गौरवण्यात आलेला सातवा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहलाही दोन बळी घेतल्याबद्दल दोनदा सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video

भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं

IND VS NZ: पहिला वनडे सामना कुठे फिरला? कर्णधार शुभमन गिलने शून्यावर बाद झालेल्या रोहितला दिलं श्रेय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरूवात विजयाने झाली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात भारताने

IND vs NZ, 1st ODI: भारताने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला पाजलं पराभवाचं पाणी, असा झाला सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरू असून पहिल्याच सामन्यात भारताने सरशी घेतली. या सामन्यात नाणेफेकीचा

विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच! धनुष्य-बाण सेलिब्रेशन पाहून चाहते म्हणाले, ‘रामायणाचा प्रचार सुरू आहे का?’

ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात माजी भारतीय

IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला नवा इतिहास

[caption id="attachment_1072039" align="aligncenter" width="800"] ऑकलँडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीच्या

0,0,0,0,0,W..! न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्मा शून्य, वर्ल्डकपपूर्वीच्या कामगिरीला धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल