
मुंबई: शासकीय नोकऱ्यांमधील ओबीसींच्या अनुशेषाचा मुद्दा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कळीचा ठरला असून, मंत्री छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी ...
बारव संवर्धनासाठी जलस्त्रोत मोकळे करण्यावर भर
बारवांच्या कामांमध्ये केवळ बांधकाम किंवा सुशोभीकरणावर भर न देता गाळ काढून जलस्रोत मोकळे होतील आणि पाणी उपलब्ध होईल, अशा कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वॉटर टाईटनिंगची दुरुस्तीही करावी. हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देऊन कामांचा क्रम निश्चित करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.जालना येथील एका ऐतिहासिक पुष्करणीतून 70 ट्रक गाळ काढल्यानंतर तेथे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. याच धर्तीवर विभागीय स्तरावर चार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 16 ठिकाणी बारवांची कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांचे तसेच भविष्यातील कामांचे कामापूर्वीचे आणि कामानंतरचे छायाचित्रे व व्हिडिओंच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध उपक्रमांचा आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले.
•बारवांच्या कामांमध्ये बांधकाम व सुशोभीकरणापेक्षा गाळ काढून जलस्रोत मोकळे करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. •पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी वॉटर टाइटनिंगची दुरुस्ती करावी. •हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने कामे हाती घ्यावीत. •बारव संवर्धनाच्या कामापूर्वीची आणि कामानंतरची छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करावे. •जालना येथील ऐतिहासिक पुष्करणीच्या यशस्वी कामाच्या धर्तीवर अन्य ठिकाणीही जलस्रोत पुनरुज्जीवनाची कामे करावीत. •सांस्कृतिक कार्यक्रमांमधील मोठ्या सोहळ्यांवरील आणि अनावश्यक सजावटीवरील खर्चाला मर्यादा घालावी. •बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त भागातील लोककलावंतांच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावा. •दुष्काळग्रस्त तालुक्यांतील स्थानिक कलाकारांकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज मागवावेत. •माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे नोंदणीकृत संस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. •प्रत्येक जिल्ह्यातील मराठी भाषा अधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून संनियंत्रण यंत्रणा उभारावी. •पुढील १५ दिवसांत या कार्यक्रमांची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे नियोजन करावे. #Maharashtra #AshishShelar — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 4, 2026
मुंबई: उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, ...




