Shrikant Shinde on Purnekar Case: पूर्णेकर हत्या प्रकरणावरून श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांचे कान टोचले; नंदनवन बंगल्यावर बैठक

मुंबई : ठाण्यातील उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, या प्रकरणात शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली गेली नसल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांकडे नाराजी व्यक्त केली. नंदनवन बंगल्यावर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी प्रवक्त्यांचे कान टोचत यापुढे पक्षाची भूमिका मांडताना एकवाक्यता आणि सुसूत्रता राखण्याचे निर्देश दिले. पूर्णेकर हत्या प्रकरणाबरोबरच विधान परिषद निवडणुकीतील भाजपशी संबंधित वाद आणि अभिनेत्री दिया मिर्झाशी संबंधित प्रकरणातही प्रवक्त्यांकडून विसंगत भूमिका मांडली गेल्याचे बैठकीत नमूद करण्यात आल्याचे समजते.

उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप उबाठा गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राजकीय पातळीवर स्पष्टीकरण द्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका कशी मांडली जावी, याबाबत चर्चा केली.



पूर्णेकर प्रकरणात प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू अपेक्षित पद्धतीने मांडली नसल्याची नाराजी श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीत भाजपशी झालेला वाद आणि दिया मिर्झा प्रकरणातही प्रवक्त्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापुढे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी पक्षाकडून अधिकृत भूमिका निश्चित केली जाईल. त्यानंतर कोणत्या प्रवक्त्याने किती आणि कोणत्या मुद्द्यांवर बोलायचे, याची जबाबदारी ठरवली जाणार आहे.

बैठकीत काय ठरले?

प्रवक्त्यांच्या कामाचे विषय आणि भाषेनुसारही विभाजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मराठी आणि महापालिकेशी संबंधित विषय कोण मांडणार, हिंदी व इंग्रजीत पक्षाची बाजू कोण मांडणार, राज्यस्तरीय विषयांची जबाबदारी कोणाकडे असेल, तसेच दिल्ली आणि राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवर कोण बोलणार, याची विभागणी केली जाणार आहे. हिंदी आणि इंग्रजीत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी मिलिंद देवरा आणि शायना एनसी यांच्याकडे, तर स्थानिक विषयांवर नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे समजते.
Comments
Add Comment

Raj Thackeray : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द

मुंबई : राज्यातील दुष्काळाची तीव्रता आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण

Salman Khan New Song controversy: 'तेरी सेक्सी ब्यूटी' या सलमानच्या नव्या गाण्याने चाहते संभ्रमात;  युद्धपटात रोमँटिक गाणं का?

Salman Khan New Song controversy: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांनी त्यांच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या

IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला नवा इतिहास

[caption id="attachment_1072039" align="aligncenter" width="800"] ऑकलँडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीच्या

Congress MP Viral Video: श्यामकुमार हे वागणं बरं न्हवं...! काँग्रेस खासदाराने महिला खासदाराला मारली चापट; व्हिडिओ वायरल

दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रामलीला मैदानावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस

Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

Salman Khan new song released: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या जोडीचे ‘तेरी सेक्सी

0,0,0,0,0,W..! न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्मा शून्य, वर्ल्डकपपूर्वीच्या कामगिरीला धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल