Salman Khan new song released: ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सलमान खानच्या आवाजाची जादू; ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे प्रदर्शित!

Salman Khan new song released: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या जोडीचे ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ (Teri Sexy Beauty) हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ (Maatrubhumi: May War Rest In Peace) या चित्रपटातील हे गाणे आहे. भाईजानचा आवाज आणि चित्रांगदा यांचा ग्लॅमरस अंदाज यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळत असून, दोघांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकत आहे.


या नव्या जोडीच्या रूपात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह या गाण्यात एकत्र दिसत आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री हे गाण्याचे प्रमुख आकर्षण ठरत असून, गाण्यात चित्रांगदा अत्यंत आकर्षक दिसतआहे. सलमान यांचा सहजसुंदर अंदाज आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स कमालीचा आहे. या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढते. दोघांमधील खास बॉन्डिंगमुळे हे नवे गाणे चाहत्यांसाठी अधिकच मनोरंजक ठरत आहे. या गाण्याची खासियत म्हणजे खुद्द सलमान खान हे गाणे गात असून, चाहत्यांना तब्बल ११ वर्षांनंतर भाईजानच्या आवाजातील गाण्याचा आनंद घेता येत आहे. हे गाणे त्याने गायिका मुस्कानसोबत गायले आहे. सलमान खानने बुधवारी (४ नोव्हेंबर २०२६) पहाटे ५:१२ वाजता सोशल मीडियावर एक मजेशीर कॅप्शन लिहीत या गाण्याची घोषणा केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, "रवाना होण्याची वेळ पहाटे ५:१२... फ्लाइट वेळेवर आहे, २ पेग मारून मी माझ्या सेक्सी ब्यूटीसोबत उड्डाण करत आहे... माहिती नाही मी कुठे लँड करेन."



‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा एक गंभीर युद्धपट (War Drama) वाटत असला, तरी या गाण्यात भरपूर रोमान्स, मस्ती, धमाल आणि खोडकरपणा पाहायला मिळत आहे. गाण्यात चित्रांगदा सिंहचा अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत असून, लाल साडीतील तिच्या रूपाने आणि सलमानसोबतच्या भन्नाट केमिस्ट्रीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचे संगीत साजिद खान यांनी केले असून, गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. सदर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन (Choreography) प्रसिद्ध कोरिओग्राफर सीझर गोन्साल्विस (Caesar Gonsalves) यांनी केले आहे.





अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्याचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे.

Comments
Add Comment

Jailer 2 OTT Release : रजनीकांत यांच्या 'जेलर 2'चा ओटीटीवर अनकट व्हर्जन येणार ! पण कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर ? जाणून घ्या

Jailer 2 OTT Release : सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने

Last Man In Tower: मनोज वाजपेयी, दिव्या दत्ता आणि बोमन इराणी अभिनीत ‘लास्ट मॅन इन टॉवर’चा प्रीमियर 6 नोव्हेंबर रोजी हिंदी Zee 5 वर प्रदर्शित

Last Man In Tower: सतत बदलत जाणाऱ्या शहरात, काही गोष्टी मागे सोडणे कठीण असते. हेच मनोज वाजपेयी, बोमन इराणी आणि दिव्या दत्ता

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा पिवळ्या साडीतील मोहक अंदाज; सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं!

[caption id="attachment_1071867" align="alignnone" width="800"] काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला

Gautami Patil : वडिलांबद्दल खंत व्यक्त करताना गौतमी पाटीलची मोठे वक्तव्य म्हणाली, मी माझ्या वडिलांना...

Gautami Patil : "सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे गर्दी आणि

भव्य स्टारकास्ट, थरारक कथा! ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं

Rashmika Mandanna Mysaa : रश्मिका मंदानाच्या 'मायसा' चित्रपटातील 'ओ मायसा रे' गाणे रिलीज; अभिनेत्रीचा संताप आणि रागीट अवतार पाहून चाहते झाले अवाक!

मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा आगामी आणि अतिशय उत्सुकतेचा विषय असलेला