Uttar Pradesh : अयोध्या, काशी आणि मथुरेत बॉम्बस्फोटाची धमकी; शाळांना ईमेल, यूपी एटीएसकडून तपास सुरू

तसेच या काळात मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन शाळा प्रशासनाला करण्यात आले आहे. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Crime News: दिवाळीच्या काळात उत्तर प्रदेशातील अयोध्या, काशी आणि मथुरा येथे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ईमेल समोर आला आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने पाठवण्यात आलेल्या या ईमेलमध्ये 8 ते 27 नोव्हेंबरदरम्यान स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन शाळा प्रशासनाला करण्यात आले आहे. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.



अयोध्या आणि आंबेडकर नगरमधील शाळांना ईमेल


मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील एका ICSE संलग्न शाळेला धमकीचा ईमेल प्राप्त झाला. याशिवाय आंबेडकर नगरमधील दोन शाळांनाही अशाच प्रकारचे ईमेल पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, संबंधित तारखांदरम्यान मुलांना शाळेत न पाठवण्याचा इशारा या ईमेलमध्ये देण्यात आला आहे.



1984 च्या दंगलींचाही उल्लेख


धमकीच्या ईमेलमध्ये 1984 मधील शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देण्यात आला आहे. 'रक्ताचा बदला रक्त' अशा शब्दांचा वापर करत हिंसक कारवायांचे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच अयोध्या, काशी आणि मथुरा ही ठिकाणे लक्ष्य असल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे.



सायबर सेल आणि यूपी एटीएसकडून तपास


या धमकीच्या ईमेलची अयोध्या सायबर सेलने दखल घेत तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकालाही (UP ATS) तपासात सहभागी करण्यात आल्याची माहिती आहे. ईमेल नेमका कोणी पाठवला, त्यामागे कोण आहे आणि कोणत्या माध्यमातून तो पाठवण्यात आला, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.


दरम्यान, ईमेलमधील धमकीची सत्यता आणि संभाव्य धोका याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.


Comments
Add Comment

BMC : आयुक्तांसह महापालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना त्वरीत निलंबित करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या

PM Suryaghar Yojana : पीएम सूर्यघर योजनेचा वेग वाढणार! आता 4 ते 5 दिवसांत 1 लाख घरांवर सोलर पॅनल बसणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारची पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना देशभरात लोकप्रिय होत असून, या योजनेअंतर्गत सौरऊर्जा

BMC : मुंबई महापालिका सभागृह बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव लांबणीवर; सादर केलेला प्रस्ताव तांत्रिक कारणाने प्रशासनाने घेतला मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

महापालिकेच्यावतीने बांधकामांच्या ठिकाणी होणार थर्ड पार्टी ऑडीट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

राणीबागेत आशियाई सिंह येण्याची वाट मोकळी! साकरबाग व मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी

Diwali Exhibition : महानगरपालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध