एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये दिवाळी भेट! पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण उचल; महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला. एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली.


“एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. “एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत! तिलोक जैन विद्यालयात जोरदार स्वागत; भारतीय नोकऱ्यांचे आकर्षण वाढणार?

पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून

160 Crore Package: आदिम जमाती आणि पारधी समाजासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज

मुंबई(सुहास शेलार): राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींसह पारधी

सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पालकमंत्री नितेश राणेंची कोकणवासीयांना साद ‘येवा, कोकण आपलोच आसा!’

सिंधुदुर्ग : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यानच्या विमानसेवेचे

MPSC Mega Bharti: एमपीएससीच्या गट-क परीक्षेतील पदसंख्या 16 हजारांवर जाणार?

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी जाहीर झालेल्या पदसंख्येत

गोकूळवर संचालक नेमले नसते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती !

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकूळ’च्या कारभारावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये

Shivendrasinh Raje Bhosale : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके प्राधान्याने देणार; 9,700 कोटींचा निधी वितरित

Maharashtra News: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे 9,700 कोटी