Election commission of India SSR Process: केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनासाठी (SSR)ची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2027 ही पात्रता तारीख मानून,हा आदेश जारी केला आहे. या भागांमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध केला जाईल, तर अंतिम यादी 21 जानेवारी 2027 रोजी प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, या प्रक्रियेमध्ये नवीन मतदारांची नावे ही समाविष्ट केली जाणार आहे. तसेच २०२७ मध्ये १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांचे आगाऊ अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याशिवाय १ एप्रिल, १ जुलै आणि 1 ऑक्टोबर2027 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे तरुण देखील मतदार यादीत आगाऊ समावेशासाठी अर्ज करू शकतील. याआधी, निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडसह 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणांची (SSR) घोषणा केली होती. त्यानांतर आयोगाने आता एकूण 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी विशेष संक्षिप्त सुधारणांची (SSR) घोषणा केली आहे.
कोणत्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार SSR प्रक्रिया ?
अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, मिझोराम, ओडिशा, सिक्कीम यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरावलोकनाचे (SSR) वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मिठाई आणि खव्याच्या खरेदीला वेग आला असतानाच भेसळयुक्त आणि शिळ्या अन्नपदार्थांपासून सावध राहण्याचे ...
ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (SSR) प्रक्रिया सुरू आहे किंवा पूर्ण झाली आहे, तेथे SSR चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, दिल्ली, त्रिपुरा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे.
एसएसआर (SSR) वेळापत्रक:
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण – 20 नोव्हेंबर, 2026
एकात्मिक मसुदा मतदार यादीचे प्रकाशन – 30 नोव्हेंबर, 2026
दावे आणि आक्षेप कालावधी – 30 नोव्हेंबर, 2026 ते 30 डिसेंबर, 2026
अंतिम मतदार यादीचे प्रकाशन – 21 जानेवारी, 2027
तसेच एसएसआर (SSR) प्रक्रिया पारदर्शकपणे आणि वेळेवर पूर्ण व्हावी यासाठी, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.