Nashik : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जिल्ह्यातील गावागावांत चित्ररथातून होणार जागर

Nashik : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा यामागील उद्देश आहे.



चित्ररथाच्या माध्यमातून थेट गावपातळीवर जनजागृती


चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे. योजनांचे स्वरूप, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने चित्ररथात मांडण्यात आली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून थेट गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.



चित्ररथाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती


यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ देणे, वंचित व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योजनांची माहिती प्रत्येक गावात, विकासाची संधी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला, या संकल्पनेतून चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी जनजागृती होणार आहे.


जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी गोपाल साळुंखे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Uttarakhand accident : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! इनोव्हा कार नदीत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता

गंगोत्री : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला.

Panchkula : सहा वर्षीय मुलीवरील हल्ला प्रकरण : आठ वर्षीय मुलाला जामीन, सोशल मीडियावरील व्हिडिओ हटवण्याचे आदेश

Panchkula : हरियाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत सहा वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात

Diwali 2026: धनत्रयोदशीच्या दिवशीचे महत्व, शुभ वेळ, अचूक पूजा कशी करावी? जाणून घ्या

Diwali 2026: सर्वसामान्य जनतेपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत, प्रत्येकजण दिवाळी सणाच्या वर्षभर प्रतीक्षेत असतात. त्यातील

Crime New : अवघ्या 10 हजारांच्या लाचेसाठी अडकला अधिकारी; घरात छापा मारताचं दिसलं घबाड

जळगाव : काहींना सरकारी नोकरी असूनही पैशांची हाव कमी होत नाही. आणखी पैशा हवा याकरीता ते लाच घेत असातात आणि लाच घेऊन

Hyderabad : युट्यूबवर व्हिडिओ पाहून छापल्या बनावट नोटा, हैदराबादमध्ये 6.78 कोटींच्या नोटा जप्त

हैदराबाद : तेलंगणा पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करून त्यांची बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या

Delhi: चावडी बाजारात अचानक कोसळली तीन मजली इमारत; ढिगाऱ्याखाली अडकले नागरिक

जुन्या दिल्लीतील चावडी बाजार परिसरातील 'गली सितारा' येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास एक मोठी आणि दुर्दैवी