Ahilyanagar Diwali News: वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून उजळले संस्कारांचे दीप; जेएसएस गुरुकुलचा उपक्रम

अहिल्यानगरच्या केडगाव येथील JSS गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आरणगाव मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. किराणा साहित्य, कपडे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत विद्यार्थ्यांनी माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचा प्रेरणादायी संदेश दिला.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याचा आणि माणुसकीचा प्रकाश सर्वत्र पसरविण्याचा सण आहे. हाच दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून जपत केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आरणगाव येथील मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत किराणा साहित्य, कपडे, अन्नधान्य, साफसफाईचे साहित्य तसेच दैनंदिन वापरातील विविध जीवनावश्‍यक वस्तू भेट देत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.



प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मदतकार्य न ठरता माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देणारा अनुभव ठरला. या साठी प्राचार्य कटारिया यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या घरून शक्य होईल त्या स्वरूपात मदत घेऊन येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार विविध वस्तू गोळा केल्या. काही विद्यार्थ्यांनी किराणा साहित्य, काहींनी कपडे, तर काहींनी साफसफाईसाठी लागणारे साहित्य आणले. या शिवाय अन्नधान्य आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचाही समावेश करण्यात आला. एकत्रितपणे जमा केलेले हे साहित्य मानव सेवा प्रकल्पातील गरजूंसाठी भेट देण्यात आले.


मानव सेवा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथील वंचितांची परिस्थिती, त्यांचे संगोपन, दैनंदिन गरजा आणि प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांची घेतली जाणारी काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रकल्पाचे कार्य आणि तेथील वंचितांची परिस्थिती जाणून घेताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. विशेष म्हणजे, या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी केवळ दिवाळीपुरतेच मदतकार्य मर्यादित न ठेवता यापुढे आपले वाढदिवस आणि जीवनातील विविध आनंदाचे प्रसंगही मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाबद्दल मानव सेवा प्रकल्पाच्या वतीने जेएसएस प्राचार्य कटारिया आणि निकिता कटारिया यांचे विशेष कौतुक करण्यात आले. जेएसएस गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच असे संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना प्रकल्पाचे जाधव यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Farmers Relief: दुष्काळग्रस्त 87 लाख 45 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा

Ahilyanagar News: टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना फराळाचे वाटप, पुण्याच्या आनंद यात्री मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा

अहिल्यानगर पोलिसांची विशेष मोहीम, 87 मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना सुपूर्द

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर शहर उपविभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले किंवा चोरीला

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मोठा निर्णय! ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाला गती, जायकाकडून 20 हजार कोटींच्या निधीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई: मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने

Maharashtra Drought News : दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील शेतकरी-पशुपालकांना दिलासा! जलाशयांतील गाळपेरा क्षेत्र चारा लागवडीसाठी भाडेपट्ट्याने मिळणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा एक

Navi Mumbai Airport : मुंबई ते कोकण प्रवास होणार अवघ्या 70 मिनिटांत; नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचे बुकिंग सुरू

मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते