Ahilyanagar News: टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना फराळाचे वाटप, पुण्याच्या आनंद यात्री मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा कोठेही फारसा उत्साह जाणवत नाही. हाता-तोंडाची लढाई अहोरात्र लढत काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे तोंड गोड करण्याच्या उद्देशाने पुण्याच्या आनंद यात्री मित्र मंडळाने दिवाळीच्या फराळाचे वाटप केले.

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा कोठेही फारसा उत्साह जाणवत नाही. हाता-तोंडाची लढाई अहोरात्र लढत काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे तोंड गोड करण्याच्या उद्देशाने पुण्याच्या आनंद यात्री मित्र मंडळाने दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर घटकावर हास्य फुलले.


पुण्याचे राम चिंचणीकर व शुभदा ताकभाते यांच्या पुढाकाराने फेसबुकवरच्या सुमारे 14 हजार मित्र-मैत्रिणींचे मंडळ आहे. विधायक सामाजिक उपक्रम करत सेवा कार्याचा आनंद अशा मित्रांकडून मिळवला जातो. आनंदी, समाधानी व सेवाभावी समूह जीवनासाठी या मंडळाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. पाथर्डीचे भूमिपुत्र तथा या मंडळाचे सदस्य नितीन अदवंत यांनी मंडळापुढे तालुक्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती मांडली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात दुष्काळग्रस्त भागात दिवाळीचा फराळ वाटप करण्याचा निर्णय घेत मंडळातर्फे मंदार पाठक व अविनाश फंड पाथर्डी दाखल झाले. माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, हाजी हुमायून भाई आतार, दिगंबर गाडे, यांच्याशी चर्चा करत शहरातील पगारे वस्ती, मातंग वस्ती तालुक्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त असणाऱ्या माणिकदौंडी परिसरातील व रांजणी येथील भिल्ल वस्ती येथे फराळाचे वाटप केले.



बाजार समितीतील हमाल, मापाडी यांनाही आंबेडकर भवन मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत फराळाचे वाटप करण्यात आले. आनंद यात्रींची यात्रा खऱ्या अर्थाने चिंताग्रस्त गोरगरिबांना आनंद देणारी ठरली. ऊस तोडणी कामगार, कोळसा कामगार, असा वर्ग तालुक्यात अधिक आहे.


यंदा उसाचे उत्पादनही समाधानकारक नसल्याने तोडणी कामगारांच्या हाताला पुरेसे काम नाही. तीव्र महागाईमुळे जगण्याची लढाई हीच आता अस्तित्वाची लढाई झाली आहे. दुर्गम डोंगराळ भागात तर आजच जगण्याचा प्रश्न भेडसावत आहे. बऱ्याच गावांमध्ये दिवाळीचा सण केवळ मुलाबाळांसाठीच ओढून ताणून साजरा केला जात आहे. ग्रामीण भागात तर जनावरे जगण्यासाठी व पोटाला दोन घास मिळावेत यासाठी स्थलांतर अटळ आहे. अशा परिस्थितीत टंचाईग्रस्तांना शक्य ती सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी विविध संघटना व कार्यकर्ते सरसावल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.



"डोळ्यापुढे आलेल्या दिवाळीच्या सणाने काही कुटुंबातील चिंता क्षणभर कमी करता आली, याचा आम्हाला आनंद वाटतो. दुष्काळी जनतेच्या रुपात ईश्वर पाहून आम्हाला त्याची सेवा करण्याची संधी मिळाली, यात ‘आनंद यात्री’ धन्यता मानतात. दुष्काळाचे संकट दूर होऊन सर्वांना सुख लाभावे,” अशा शब्दांत आनंद यात्रेच्या प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या. रांजणी येथील भिल्ल वस्तीतील काही महिलांचे डोळे मदतीच्या या भावनेने पाणावले. "आमचे जाऊ द्या, आमच्या लेकरांचे तोंड गोड झाले, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. परमेश्वर तुम्हाला खूप आयुष्य देवो," अशा शब्दात वस्तीवरील महिलांनी भावना व्यक्त केल्या.


पाथर्डी येथील आंबेडकर भवन मध्ये हमाल मापाडी यांना समारंभपूर्वक शिधा वाटप करण्यात आले .यावेळी महेंद्र राजगुरू, जावेद भाई पठाण, बाळासाहेब सोनटक्के, सीताराम बोरुडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दिगंबर गाडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

Comments
Add Comment

Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

पुणे: अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात एक मोठे यश मिळवत, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने

Farmers Relief: दुष्काळग्रस्त 87 लाख 45 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा

Ahilyanagar Diwali News: वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून उजळले संस्कारांचे दीप; जेएसएस गुरुकुलचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर

अहिल्यानगर पोलिसांची विशेष मोहीम, 87 मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना सुपूर्द

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर शहर उपविभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले किंवा चोरीला

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मोठा निर्णय! ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाला गती, जायकाकडून 20 हजार कोटींच्या निधीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई: मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने

Maharashtra Drought News : दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील शेतकरी-पशुपालकांना दिलासा! जलाशयांतील गाळपेरा क्षेत्र चारा लागवडीसाठी भाडेपट्ट्याने मिळणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा एक