भारत सरकारचा मोठा निर्णय ! 3 स्वदेशी AI मॉडेल लॉन्च, खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

EKA-1, Dhir 2B आणि Dhir 5B या तीन स्वदेशी AI मॉडेलच्या लॉन्चमुळे भारताच्या AI क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय भाषा, स्थानिक गरजा आणि देशातील विविध उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून AI तंत्रज्ञान विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टेक्नोलॉजीच्या जगात भारताने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने तीन नवीन स्वदेशी AI मॉडेल लॉन्च केले आहेत. EKA-1, Dhir 2B आणि Dhir 5B अशी या तीन AI मॉडेलची नावे आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) IndiaAI मिशनच्या सहकार्याने हे AI मॉडेल सादर केले आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही AI मॉडेल भारतातच विकसित करण्यात आले असून, भारतीय भाषा आणि देशातील व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात परदेशी AI टूल्सवरील भारताचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.


नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात या तीन AI मॉडेलचे अनावरण करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते. या AI मॉडेलचा वापर सरकारी कार्यालये, संशोधन केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करता येणार आहे. या तीन मॉडेलपैकी Dhir 2B आणि Dhir 5B यांची खासियत म्हणजे ते इंटरनेटशिवायही वापरता येऊ शकतात. त्यामुळे AI वापरण्यासाठी सतत इंटरनेट कनेक्शन किंवा मोठ्या क्लाउड सर्व्हरची गरज भासणार नाही. चला तर जाणून घेऊया या तीन स्वदेशी AI मॉडेलची वैशिष्ट्ये.



 EKA-1 AI मॉडेलची काय आहेत वैशिष्ट्ये ?


EKA-1 हे या तीन AI मॉडेलपैकी सर्वात मोठे आणि प्रगत मॉडेल आहे. बंगळुरूमधील Soket Labs या स्टार्टअपने हे मॉडेल विकसित केले आहे.हे एक ओपन आणि स्पार्स हायब्रिड लँग्वेज मॉडेल आहे. विशेषतः अवघड आणि तांत्रिक कामे करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे.EKA-1 च्या मदतीने अ‍ॅडव्हान्स्ड गणित, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आणि लॉजिकल रिझनिंग यांसारख्या कठीण प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. याशिवाय हे AI एजंट म्हणूनही काम करू शकते. म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करण्याची क्षमता यामध्ये आहे.



या मॉडेलची क्षमता त्याच्या तांत्रिक आकडेवारीवरून लक्षात येते.


26.3 अब्ज पॅरामीटर्स: EKA-1 हे 26.3 अब्ज पॅरामीटर्सवर आधारित आहे.


7.5 ट्रिलियन टोकन्स: या मॉडेलला तब्बल 7.5 ट्रिलियन टेक्स्ट टोकन्सच्या डेटावर ट्रेन करण्यात आले आहे.


बहुभाषिक क्षमता: इंग्रजीसह भारतातील सर्व अनुसूचित भाषा समजून घेण्याची क्षमता यामध्ये आहे.


प्रगत कामे: गणित, कोडिंग, रिझनिंग आणि विविध तांत्रिक कामांसाठी याचा उपयोग होऊ शकतो.


विशेष म्हणजे, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रांतील गरजा लक्षात घेऊन EKA-1 विकसित करण्यात आले आहे.




Dhir 2B आणि Dhir 5B AI मॉडेलची वैशिष्ट्ये काय ?


EKA-1 प्रमाणेच Dhir 2B आणि Dhir 5B ही दोन स्वदेशी AI मॉडेलदेखील महत्त्वाची आहेत. मात्र, या दोन्ही मॉडेलची निर्मिती वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे.ZenteiQ AiTech Innovation या कंपनीने Dhir 2B आणि Dhir 5B विकसित केले आहेत. या दोन्ही AI मॉडेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा वापर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. त्यामुळे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही या AI टूल्सचा उपयोग होऊ शकतो.



इंटरनेटशिवाय चालणार AI मॉडेल


Dhir 2B आणि Dhir 5B या मॉडेलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑफलाइन वापरता येतात. यासाठी मोठ्या क्लाउड सर्व्हरची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.हे मॉडेल थेट फोन किंवा लॅपटॉपवर डाउनलोड करून वापरता येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी AI वापरण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.विशेषतः विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या भागांमध्येही अशा प्रकारच्या AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या संधी वाढू शकतात.



भारताच्या AI क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल


EKA-1, Dhir 2B आणि Dhir 5B या तीन स्वदेशी AI मॉडेलच्या लॉन्चमुळे भारताच्या AI क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय भाषा, स्थानिक गरजा आणि देशातील विविध उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून AI तंत्रज्ञान विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे सरकारी कामकाज, शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रात AI चा वापर वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच परदेशी AI प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments
Add Comment

India Hypersonic Missile Test: ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेग! भारताच्या हायपरसोनिक तंत्रज्ञानाची जगभर चर्चा

भारताच्या संरक्षण क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भारत

CAT 2026 : CAT 2026 चे प्रवेशपत्र जारी; 29 नोव्हेंबरला तीन सत्रांत होणार परीक्षा

 CAT 2026: व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम

Nana Patekar Memories:  नाना पाटकरांच्या आठवणीत क्रांती रेडकर भावुक, म्हणाली इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'...

Nana Patekar Memories: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रांतीने 'मैत्रेया' (Maitreyaa)

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

[caption id="attachment_1072774" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या

Navi Mumbai Airport : मुंबई ते कोकण प्रवास होणार अवघ्या 70 मिनिटांत; नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचे बुकिंग सुरू

मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते