अखेर अंधार संपला! केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टने टिटवाळ्यातील आदिवासी पाडे उजळले!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) टिटवाळ्यातील आदिवासी पाड्यांवरील वर्षोंवर्षे चाललेला अंधार दूर करत 50 नवीन पथदिवे सुरू केले आहेत, ज्यामुळे रहिवाशांची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून निघाली आहे.

कल्याण : वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगणाऱ्या टिटवाळ्यातील आदिवासी पाड्यांवर अखेर प्रकाशाची किरणे पोहोचली आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 5 नोव्हेंबर रोजी 50 नवीन पथदिवे सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशमय झाली आहे.



महिला आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार


काही आठवड्यांपूर्वी विविध आदिवासी पाड्यांतील रहिवाशांनी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती. रस्त्यांवर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः महिला आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न त्यांनी आयुक्तांसमोर मांडला. या समस्येची तातडीने दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले. अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने वेगाने काम पूर्ण करत दिवाळीपूर्वीच आदिवासी पाड्यांवर उजेड आणला.



22 आदिवासी पाड्यांमध्ये 185 पथदिवे सुरू


केडीएमसीच्या आकडेवारीनुसार, टिटवाळा परिसरात एकूण 22 आदिवासी पाडे आहेत. 2024 ते 2026 या कालावधीत या वस्त्यांमध्ये 185 पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. 2026-27 या वर्षासाठी आणखी 100 पथदिवे सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी 50 दिवे 5 नोव्हेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आले. नवीन पथदिवे सुरू करण्यात आलेल्या भागांमध्ये ठाकूर पाडा (6), गणेश विद्यालय-एमटीडीसी आदिवासी पाडा (8), गणेश मंदिर आदिवासी पाडा (11), गणेशवाडी दर्गा परिसर (11), बिर्ला कॉलेजमागील मिलिंद नगर (2), इंदिरा नगर (3), वाघमारे आळी (4), कल्याणमधील काटकर वस्ती (1) आणि आधारवाडी तुरुंगामागील वस्ती (4) यांचा समावेश आहे.



ग्रामस्थांची दिवाळी झाली प्रकाशमय


पालिकेच्या या जलद आणि लोककल्याणकारी निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या वस्त्यांमध्ये पथदिवे सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. उर्वरित 50 पथदिवेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

[caption id="attachment_1072964" align="alignnone" width="800"] अभिनेत्री गौरी इंगवले हीचा दशमी हा चित्रपट 23ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

Diwali Firecracker Pollution: दिवाळीचा आनंद की आरोग्याचा धोका? फटाक्यांच्या धुरापासून राहा दूर

 Diwali Firecracker Pollution:  दिवाळीत फटाक्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतिषबाजी आलीच पाहिजे. पण

दक्षिण दिल्लीतील किया कार शोरूमला भीषण आग; 7 जण जखमी, 12 ते 15 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब परिसरात असलेल्या किया कार शोरूमला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची

India vs New Zealand live streaming: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने

Shehzad Poonawalla: राइज अँड फॉल सीझन २ चा विजेता शहजाद पूनावाला; विनिंग रक्कम बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी दान

Rise and Fall Season 2 winner:  'एमएक्स ओरिजिनल राइज अँड फॉल सीझन 2' चा विजेता शहजाद पूनावाला ठरला आहे. 6 आठवड्यांच्या स्पर्धेनंतर

स्पाइसजेटच्या मनमानीचा भडका! बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा संताप अनावर; अन् थेट कर्मचाऱ्यालाच.....

बंगळुरू: विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी