Nanded News : आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा भोवला, नांदेडमध्ये ११ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आरोग्य संवाद यात्रेदरम्यान दणका; १० जणांच्या चौकशीचे, तर चार जणांच्या बदलीचेही आदेश

मुंबई : सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुरू केलेल्या आरोग्य संवाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी नांदेडमध्ये कारवाईचा बडगा उगारला. लोहा, मुखेड, हिमायतनगर आणि सोनखेड या तालुक्यांतील आरोग्य संस्थांच्या पाहणीदरम्यान आरोग्यसेवेत हलगर्जीपणा आणि अकार्यक्षमता आढळल्याने ११ जणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय १० जणांच्या चौकशीचे आणि चार जणांच्या बदलीचे आदेशही देण्यात आले आहेत.



आरोग्यमंत्री आबिटकर सध्या आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या दौऱ्यांत जिल्हा आणि तालुका पातळीवरील दवाखाने तसेच रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील पाहणीदरम्यान काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि रुग्णांना आवश्यक सेवा देण्यात येत असलेली दिरंगाई त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले.


या कारवाईत सहा डॉक्टर, दोन आयडीडब्ल्यू अभियंते, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दोन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएम) आणि दोन तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच अन्य १० जणांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार जणांच्या तातडीने बदलीचे आदेशही देण्यात आले आहेत.


या कारवाईमुळे आरोग्य विभागातील अकार्यक्षम आणि बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान पुढील जिल्ह्यांचा दौरा नियोजित असल्याने संबंधित ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी आणि कामकाजाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार असून, त्यात ६७४ विशेषज्ञ आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport : मुंबई ते कोकण प्रवास होणार अवघ्या 70 मिनिटांत; नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचे बुकिंग सुरू

मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते

निदा खानला ३५ दिवस मदत करणारा इम्तियाज जलील मुख्य आरोपी - संजय शिरसाट यांचा दावा; संपूर्ण कारस्थान जलील यांनी रचल्याचा आरोप

मुंबई : नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून

ST Bus प्रवाशांसाठी मोठी बातमी ! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्डसाठी मुदतवाढ

NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी

Navi Mumbai Crime News : कोपरखैरणेत थरार! प्रेमप्रकरणातून दोन बहिणींवर झाडल्या गोळ्या, आरोपीला अटक

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात घरात घुसून दोन बहिणींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Satara News : दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी

Satara News: दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींवर साताऱ्यात अपघाताचे संकट

Census Training Maharashtra: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी ४ दिवसीय प्रशिक्षण; राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन

मुंबई: राज्यात सगळीकडे जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या