Census Training Maharashtra: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी ४ दिवसीय प्रशिक्षण; राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन

राज्यात सगळीकडे जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या जनगणनेसंदर्भात जनगणना 2027 संदर्भात चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे 5 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाला.

मुंबई: राज्यात सगळीकडे जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या जनगणनेसंदर्भात जनगणना 2027 संदर्भात चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे 5 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र येथील 28 अधिकाऱ्यांनी, सहा महसूली विभागांमधून एकूण 120 मास्टर ट्रेनर्स या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचे दोन सत्रांमध्ये प्रत्येकी दोन बॅचेस असे विभाजन करण्यात आले होते. पहिले सत्र (बॅच । व II) 28 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत, तर दुसरे सत्र (बॅच III व IV) 2 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले.


महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नामनिर्देशित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती राज्य जनगणना नोडल अधिकारी तथा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडून करण्यात आली. या मास्टर ट्रेनर्सना जनगणना संचालनालय, महाराष्ट्र येथील नॅशनल ट्रेनर्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष सराव यांचा समावेश होता. यामध्ये जनगणनेच्या संकल्पना, लोकसंख्या गणनेतील प्रश्नावली लोकसंख्या गणनेसाठीचे मोबाईल ॲप, स्व-गणना आणि प्रगणक गटाचे मांडणी दर्शक नकाशे या विषयांचा समावेश होता. तसेच सूक्ष्म अध्यापन, PRAMAN कार्यपद्धतीवर आधारित जबाबदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे माहिती संकलनाचा सराव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याच्या कौशल्यांचाही सराव करून घेण्यात आला. (Census Training Maharashtra)



प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतेवेळी, केंद्र शासनाचे सहसचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी आगामी जनगणनेमध्ये मास्टर ट्रेनर्सची महत्वाची भूमिका काय व कशी असेल हे अधोरेखित केले. तसेच क्षेत्रीय कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय व तांत्रिक सहाय्य सातत्याने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.


"जनगणनेचा पहिला टप्पा अर्थात 'घरयादी व घरगणना' राज्यात अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच 'लोकसंख्या गणना' सुरू होणार असून, या टप्प्यामध्ये नागरिकांची प्रत्यक्ष माहिती संकलित करण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनर्सची जबाबदारी केवळ वर्गातील प्रशिक्षण देण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी सातत्याने सहभागी राहून क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. तसेच, फेर तपासणी फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे." ,असे डॉ. निरुपमा जे. डांगे म्हणाल्या.


मास्टर ट्रेनर्सच्या जबाबदाऱ्यांविषयी अधिक माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यात मास्टर ट्रेनर्स राज्यातील फील्ड ट्रेनर्सना मार्गदर्शन करतील. हे फील्ड ट्रेनर्स त्यानंतर घरोघरी भेट देऊन माहिती संकलनाचे काम करणाऱ्या सुमारे 2.82 लाख प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देतील आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करतील. या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

Celebrate Diwali with farmers: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीचे वातावरण तर दुसरीकडे शेतकरी बांधवांची दुष्काळी परिस्थिती,अशा वेळी त्यांना आधार

Shivsena Diwali: शिवसेनेकडून 7 लाख 69 हजार दिवाळी शिधांचे वितरण; शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या शाखा बनणार ‘शेतकरी सेवा केंद्र’

Shivsena Diwali: प्रत्येक शेतकऱ्याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना

मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत! तिलोक जैन विद्यालयात जोरदार स्वागत; भारतीय नोकऱ्यांचे आकर्षण वाढणार?

पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून

160 Crore Package: आदिम जमाती आणि पारधी समाजासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज

मुंबई(सुहास शेलार): राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींसह पारधी

एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये दिवाळी भेट! पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण उचल; महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी

सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पालकमंत्री नितेश राणेंची कोकणवासीयांना साद ‘येवा, कोकण आपलोच आसा!’

सिंधुदुर्ग : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यानच्या विमानसेवेचे