
मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ या मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे. ‘फ्लाय 91’ (Fly91) या विमान कंपनीकडून ही सेवा पुरवली जाणार असून, 16 नोव्हेंबरपासून नियमित उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती आहे. या मार्गावरील तिकीट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी ...
अवघ्या 70 मिनिटांत नवी मुंबई ते सिंधुदुर्ग
या विमानसेवेमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई ते चिपी हा प्रवास अवघ्या 70 मिनिटांत पूर्ण होणार आहे. ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असेल. त्यामुळे कोकण आणि मुंबईदरम्यानचा हवाई संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
असे असेल विमानाचे वेळापत्रक
फ्लाय 91 च्या नियोजित वेळापत्रकानुसार, नवी मुंबईहून सिंधुदुर्गसाठी विमान सकाळी 7:55 वाजता उड्डाण करेल. हे विमान सकाळी 9:04 वाजता चिपी विमानतळावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी चिपी विमानतळावरून सकाळी 9:25 वाजता विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी 10:35 वाजता नवी मुंबई विमानतळावर दाखल होईल.
तिकीट दर 3,500 रुपयांपासून
या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाले असून, सुरुवातीचे दर साधारण 3,500 रुपयांपासून उपलब्ध असल्याची माहिती आहे. प्रवासाची तारीख आणि उपलब्धतेनुसार तिकीट दरांमध्ये बदल होऊ शकतो. 16 नोव्हेंबर रोजी या मार्गावरील पहिले उड्डाण नियोजित आहे.






