
भारताच्या संरक्षण क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भारत हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO कडून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. हायपरसोनिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारताच्या भविष्यातील संरक्षण क्षमतेला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानकडूनही संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे त्यामुळे भारताचा या प्रगतीकडे सगळ्यांचे लक्षवेधून घेतले आहे.(Faster than Speed of Sound)
हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणजे नेमके काय?
हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा किमान पाचपट अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र. ध्वनीचा वेग साधारणपणे ताशी 1,235 किलोमीटर मानला जातो. त्यानुसार हायपरसोनिक वेग म्हणजे ताशी सुमारे 6,100 किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेग. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड वेगासोबतच उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता. त्यामुळे पारंपरिक संरक्षण यंत्रणांसमोर या तंत्रज्ञानामुळे नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
रणबीर कपूरचा फेमस 'रामायण' चित्रपट अखेर 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बऱ्याच ...
भारताने हायपरसोनिक तंत्रज्ञानात कोणती प्रगती केली आहे?
भारताने 16 नोव्हेंबर 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरून लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीला भारतासाठी महत्त्वपूर्ण यश असल्याचे म्हटले होते. या यशानंतर DRDO कडून हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या विविध घटकांवर संशोधन सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 9 मे 2026 रोजी DRDO च्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीने (DRDL) हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी विकसित केलेल्या स्क्रॅमजेट इंजिनच्या पूर्ण क्षमतेच्या कंबस्टरची 1,200 सेकंदांपेक्षा अधिक काळ यशस्वी चाचणी केली. ही चाचणी हैदराबाद येथील विशेष चाचणी सुविधेत पार पडली. या यशामुळे भारताच्या हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण आधार मिळाला आहे.(DRDO Hypersonic Technology)
स्क्रॅमजेट तंत्रज्ञान काय आहे?
हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या विकासात स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. स्क्रॅमजेट हे एअर-ब्रीदिंग इंजिन आहे. म्हणजेच हे इंजिन इंधन जाळण्यासाठी वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करते. या तंत्रज्ञानामुळे दीर्घकाळ हायपरसोनिक वेगाने प्रवास करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत होते. मात्र, अशा इंजिनची रचना आणि चाचणी करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. हायपरसोनिक वेगामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता, इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि दीर्घकाळ कार्यक्षमता टिकवणे ही या तंत्रज्ञानातील महत्त्वाची आव्हाने आहेत.
भारत की शक्ति का नया अध्याय, दुश्मन के लिए 'प्रलय'! 🇮🇳
DRDO की स्वदेशी प्रलय मिसाइल का सफल उड़ान परीक्षण भारत की बढ़ती रक्षा क्षमता और आत्मनिर्भरता का सशक्त प्रमाण है। 500 किमी तक मारक क्षमता और सटीक निशाने के साथ प्रलय भारतीय सेना की सामरिक शक्ति को नई ऊंचाइयों तक ले जाएगी। भारत अब अपनी सुरक्षा के लिए आत्मनिर्भर भी है और सक्षम भी! — Abhishek Dubey (@bjpkaabhishek) November 5, 2026
चीन आणि पाकिस्तानच्या दृष्टीने भारताची प्रगती का आहे महत्त्वाची?
आशियातील संरक्षण क्षेत्रात भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला महत्त्व दिले जात आहे. चीनने हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानही आपल्या संरक्षण क्षमतेच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे.अशा परिस्थितीत भारताने स्वदेशी हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. यामुळे भविष्यात भारताच्या संरक्षण सज्जतेत वाढ होऊ शकते. तसेच स्वदेशी संशोधन आणि उत्पादनामुळे परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते.(Indian Defence Technology)
भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी पुढील काळ का आहे महत्त्वाचा?
हायपरसोनिक तंत्रज्ञानाचा विकास ही एका चाचणीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही. इंजिन, उड्डाण प्रणाली, उष्णता सहन करणारे साहित्य आणि संपूर्ण यंत्रणेच्या एकत्रित चाचण्या अशा अनेक टप्प्यांतून हे तंत्रज्ञान विकसित करावे लागते. DRDO च्या अलीकडील चाचण्यांमुळे भारताने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. मात्र, यशस्वी इंजिन चाचणी आणि प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज असलेले क्षेपणास्त्र यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या पुढील चाचण्या आणि विकासाकडे संरक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे






