Code 100 : इराणमध्ये 'कोड 100' जारी, संपूर्ण लष्कर हाय अलर्टवर ? पश्चिम आशियात युद्धाचे सावट

Code 100 :संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं आहे. त्यांनी कोड १०० जारी केला असून इराणच्या सशस्त्र दलाच्या सर्व शाखांना अ‍ॅक्टिव्ह केलं आहे. यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्स, सामान्य लष्कर, हवाई दल आणि अंतर्गत सुरक्षा पाहणाऱ्या सर्वांना संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. या घडामोडींमुळे अमेरिका, इराण आणि पश्चिम आशियातील इतर देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हालचालींमुळेही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.



इराणच्या लष्करी हालचालींची चर्चा


वृत्तांनुसार, पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे इराणने आपली लष्करी सज्जता वाढवली आहे. इराणसमर्थित हौती गटाने सौदी अरेबियाची राजधानी रियादवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटकडून या भागातील सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन नागरिकांना संभाव्य सुरक्षाविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याशिवाय, काही विमानसेवांवर परिणाम होण्याची आणि हवाई क्षेत्र बंद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.



डोनाल्ड ट्रम्प अचानक व्हाइट हाऊसमध्ये दाखल


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथील नियोजित मुक्काम अचानक संपवून व्हाइट हाऊसकडे प्रयाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा गोपनीय माहितीच्या आढाव्यासाठी ते परतल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या या हालचालीमागील नेमके कारण आणि लष्करी घडामोडींशी त्याचा संबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.



काय आहे इराणचा 'कोड 100' ?


इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या लष्करी नियमानुसार कोड १०० ही सर्वोच्च लष्करी आपत्कालीन स्थिती अन् सज्जता असते. जसा अमेरिकेत डेफकॉन १ हा कोड असतो ज्यात संपूर्ण लष्कराचं मोबिलायजेशन होतं. तसाच इराणचा कोड १०० आहे ज्यात सर्व सशस्त्र दालांचे मोबिलायजेशन होते. यात त्वरित युद्ध सज्जतेच्या दृष्टीकोणातून हालचाली केल्या जातात. ज्यावेळी कोड १०० लागू होतो त्यावेळी अनेक उच्च स्तरीय आणि उत्त प्राथमिकता असलेले आदेश हे सहाजिकच इराणच्या दुहेरी स्तर असलेल्या लष्करी व्यवस्थेला देण्यात येतात. हा कोड लागू झाल्यानंतर इराणचा मिसाईल विभाग, माहिती नसलेल्या मिसाईल सिटी आणि मोबाईल लाँचर युनिट सेकंडरी लाँचिंग पोजिशनमध्ये येतात. त्यामुळे शत्रू राष्ट्राकडून होणारा एअर स्ट्राईकमधून होणारे नुकसान रोखता येते.



क्षेपणास्त्र यंत्रणा आणि लष्करी सज्जतेबाबत काय दावे ?


काही ओपन-सोर्स इंटेलिजन्स नेटवर्क आणि विश्लेषकांच्या दाव्यानुसार, इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणांशी संबंधित हालचालींमध्ये वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. या दाव्यांमध्ये क्षेपणास्त्र तळ, मोबाइल लाँचर आणि इतर लष्करी साधनांच्या सज्जतेचा उल्लेख केला जात आहे. संभाव्य हवाई हल्ल्यांपासून लष्करी क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी इराणकडून खबरदारी घेतली जात असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र, या हालचालींची स्वतंत्र अधिकृत पुष्टी उपलब्ध नसल्याने त्यांना निश्चित लष्करी कारवाईचे संकेत मानता येणार नाही.


इराण, अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या भागातील घडामोडींकडे लागले आहे. इराणने लष्करी सज्जता वाढवल्याचे दावे, अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हालचाली आणि प्रादेशिक संघर्षाची शक्यता यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.

Comments
Add Comment

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा भीषण हवाई हल्ला ! 40 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाच्या हवाई हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जपोरिझ्झिया भागातील कोमिशुवाखा गावात 2

Benjamin Netanyahu : बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलला केले सावध; विरोधकांवर गंभीर आरोप करताना म्हणाले, बाहेर इराण, तर देशात...

Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत

Google : गुगलचा धक्कादायक निर्णय! 5 देशांत स्वेच्छानिवृत्ती जाहीर; नोकऱ्या सोडून AI वर लावणार पैसा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुगलने

US Stock Market : डेमोक्रॅट्सच्या विजयानंतर अमेरिकी शेअर बाजारात मोठी तेजी; डाऊ जोन्स 1,569 अंकांनी वधारला

International Business News: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये