BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत शिकत असलेल्या मुलाला चांगले गुण मिळाल्यामुळे तब्ब्ल 2.30 कोटी रुपयांची महागडी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. शम्सुद्दीन मिद्या असे या तांदुळ व्यापाऱ्याचे नाव असून सध्या तो पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील गलसी भागातील पराज गावात स्थित आहे.

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत शिकत असलेल्या मुलाला चांगले गुण मिळाल्यामुळे तब्ब्ल 2.30 कोटी रुपयांची महागडी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. शम्सुद्दीन मिद्या असे या तांदुळ व्यापाऱ्याचे नाव असून सध्या तो पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील गलसी भागातील पराज गावात स्थित आहे. आपला 15 वर्षीय मुलगा मोहम्मद तलहा याला नववीच्या सहामाही परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल बीएमडब्ल्यू एम४ कॉम्पिटिशन ही सुपरकार त्याला वडीलांनी भेट म्हणून दिली आहे.

गरिबीतून श्रीमंती मिळवून आपल्या मुलाला आलिशान भेटवस्तू दिल्यामुळे शम्सुद्दीन मिद्या याची संपूर्ण परिसरात चर्चा सुरु आहे. शम्सुद्दीन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा तलहा त्यांना बऱ्याच काळापासून सांगत होता, "अब्बा, मला बीएमडब्ल्यू हवी आहे." जेव्हा सहामाही परीक्षेचा निकाल लागला आणि तलहाला चांगले गुण मिळाले, तेव्हा शम्सुद्दीन यांनी वचन पूर्ण केले. मुंबईतील अंधेरी येथील एका प्रीमियम शोरूममधून बीएमडब्ल्यू एम4  (BMW M4)कॉम्पिटिशन त्यांनी खरेदी केली.

शुक्रवारी, ही नवी कोरी चकचकीत कार एका विशेष कंटेनरमधून बर्दवानमधील पराज गावात आणण्यात आली. शम्सुद्दीनचा मुलगा तलहा हा फक्त 15 वर्षांचा असल्यामुळे तो कायदेशीररित्या वाहन चालवण्याचा परवाना मिळवू शकत नाही. यावर तलहा म्हणाला की, तो सध्या आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे. आठवड्यातून एकदा वडिलांसोबत गाडीच्या पॅसेंजर सीटवर बसून प्रवास करण्याची त्याची योजना त्याने आखली आहे.



शम्सुद्दीनच्या संघर्षाची कहाणी

शम्सुद्दीन मिद्या यांची यशोगाथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा काही वेगळी नाही. अनेक अनपेक्षित वळणे, चढ-उतार यांचा सामना त्यांनी केला आहे. २००३ मध्ये, ते उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईला गेले आणि त्यांनी बॉलीवूड चित्रपटांच्या सेटवर लाईटमन म्हणून काम केले. सात वर्षे संघर्ष केल्यानंतर, 2010 मध्ये ते त्यांच्या पराज या गावी परतले. तिथे त्यांनी तांदळाचा एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि आज आपल्या मेहनतीच्या जोरावर, गालसी परिसरात त्यांच्या मालकीच्या तीन मोठ्या तांदूळ गिरण्या आहेत. आंतरराष्ट्रीय तांदूळ निर्यातदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा व्यवसाय आता केवळ बंगालपुरता मर्यादित राहिलेला नसून ते व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर आणि दुबई (यूएई) यांसारख्या देशांमध्ये तांदूळ निर्यात करतात.

शाहरुख खानच्या 'व्हीआयपी 555' नंबरचा संबंध

शम्सुद्दीनला महागड्या आणि प्रीमियम गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार संग्रहात आधीच रेंज रोव्हर, व्होल्वो, महिंद्रा थार आणि ह्युंदाई अल्काझार यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. शम्सुद्दीनच्या बहुतेक गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नंबरचे शेवटचे तीन अंक हे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या गाडयांच्या '555' या रजिस्ट्रेशन नंबरचे आहेत, त्याच्या वाहनांसाठी वापरत असलेला तोच प्रसिद्ध क्रमांक आहे. आपल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय शम्सुद्दीन देवाच्या कृपेला देतो. तसेच तो गुप्तपणे नेहमीच कोणताही गाजावाजा न करता अनेक गरजू लोकांना आर्थिक मदतही करतो.
Comments
Add Comment

Vasundhara Police Station : गाझियाबादच्या पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; उपनिरीक्षकासह डिलिव्हरी बॉय जखमी

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

दक्षिण दिल्लीतील किया कार शोरूमला भीषण आग; 7 जण जखमी, 12 ते 15 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब परिसरात असलेल्या किया कार शोरूमला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची

स्पाइसजेटच्या मनमानीचा भडका! बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा संताप अनावर; अन् थेट कर्मचाऱ्यालाच.....

बंगळुरू: विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी