Nashik : दिवाळी-भाऊबीजसाठी रेल्वेचा मोठा दिलासा ! भुसावळ-देवळालीदरम्यान 4 विशेष मेमू फेऱ्या; जळगाव, मनमाड, नाशिक रोडला थांबा

दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भुसावळ विभागातर्फे भुसावळ ते देवळालीदरम्यान चार विशेष अनारक्षित मेमू रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. १० आणि ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



भुसावळहून सकाळी ९.१५ वाजता सुटणार गाडी


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष अनारक्षित मेमू रेल्वे क्रमांक 01072 ही १० आणि ११ नोव्हेंबर रोजी भुसावळ स्थानकावरून सकाळी ९.१५ वाजता रवाना होईल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.०५ वाजता देवळाली स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी विशेष मेमू रेल्वे क्रमांक 01071 ही १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देवळाली स्थानकावरून दुपारी १.३० वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ही गाडी भुसावळ स्थानकावर पोहोचणार आहे.



या स्थानकांवर मिळणार थांबा


भुसावळ-देवळाली विशेष मेमू रेल्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड,लासलगाव, नाशिक रोड, देवळाली या विशेष मेमू रेल्वेला एकूण १२ मेमू कोच असणार आहेत.



वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना


विशेष रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील आगमन आणि प्रस्थानाच्या सविस्तर वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइट: https://www.enquiry.indianrail.gov.in तसेच NTES (National Train Enquiry System) ॲपच्या माध्यमातूनही रेल्वेचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळू शकते.



सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा


दिवाळी आणि भाऊबीज निमित्त अनेक नागरिक नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांमध्ये मोठी गर्दी निर्माण होते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विशेष मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार विशेष फेऱ्यांमुळे भुसावळ ते देवळालीदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून, सणासुदीचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत मिळणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीचा संताप, फॅन्सच्या त्या कृतीमुळे झाला नाराज

क्रिकेट मैदानात सामना सुरू असताना फॅन्स लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर, विचित्र हावभाव वगैरे करत असतात. क्रिकेट

पीक नोंदणीतील तांत्रिक अडथळे दूर होणार, ई-फेरफारद्वारे पीक पाहणीचे निर्देश; तलाठी स्तरावर होणार ऑफलाइन नोंदणी

मुंबई : तांत्रिक आणि भौगोलिक अडचणींमुळे खरीप हंगामातील ऑनलाइन पीक नोंदणी करता न येणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य

दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचा सिक्वेल; भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

निर्माती प्रियंका चोप्रा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘व्हेंटिलेटर 2’

Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीची ऐतिहासिक कसोटी कारकीर्द; पाहा 6 खास क्षण

[caption id="attachment_1073185" align="aligncenter" width="800"] नोव्हेंबर 2013 मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध मोहम्मद शमीने कसोटी पदार्पण केले.

Yetech aata me Nandayla: एकीकडे मी बांदेकरांच्या घरी नांदायला आले, तर दुसरीकडे शिवानी कदम म्हणून प्रेक्षकांच्या मनात ‘येतेच आता मी नांदायला’- पूजा बिरारी

Pooja Birari:  महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या घरी अलीकडेच नव्या सुनेचा गृहप्रवेश झाला आहे. यंदाची

Nashik : दिवाळीपूर्वी 207 भूमिहीन कुटुंबांना हक्काच्या घरासाठी मिळणार स्वतःची जागा

नाशिक : कित्येक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या जागेअभावी घरकुलापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील