Vaibhav Chavan : बोगस प्रमाणपत्रांचं बिंग फोडलं अन्...; वैभव चव्हाणच्या गूढ मृत्यूने बीडमध्ये खळबळ, पोलिसांत गुन्हा दाखल

वैभवचा भाऊ गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला.

Beed Crime News: बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली धाराशिव पोलीस भरतीत निवड झालेला नागनाथ साबळे आणि त्याला कथित बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश संघटनेतील प्रतिनिधीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वैभवचा भाऊ गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला.



बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आणले


वैभव चव्हाण हा कराटे खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्रे होती. 2024-25 मध्ये त्याने धाराशिव पोलीस भरतीसाठी खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. मात्र, समान गुण असलेल्या दुसऱ्या उमेदवाराने खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे वैभवची निवड होऊ शकली नाही.


यानंतर वैभवने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कथित बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात राज्यातील 14 पोलीस कर्मचाऱ्यांसह काही क्रीडा अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सप्टेंबर 2026 मध्ये कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना पुणे गुन्हे शाखेने अटक केली होती.



धमक्यांचे रेकॉर्डिंग मित्राला पाठवल्याचा दावा


या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे वैभवने मित्राला पाठवलेल्या कथित रेकॉर्डिंगमध्ये म्हटले होते. आपला मृत्यू कोणत्याही परिस्थितीत झाला, तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल, असे त्याने या रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याचा दावा केला जात आहे.



इमामपूर शिवारात आढळला मृतदेह


गुरुवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत वैभवचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनादरम्यान त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि पायाला जखमा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.


या मागणीसाठी नातेवाईकांनी सुमारे 12 तास ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा नवगण राजुरी येथे वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले.



पोलिसांकडून पुढील तपास सुरू


वैभवच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आता नागनाथ साबळे आणि कुराश संघटनेतील प्रतिनिधीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वैभवच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, त्याला धमक्या मिळाल्याचा आरोप आणि या प्रकरणातील इतर व्यक्तींची भूमिका यांचा पोलीस तपास करत आहेत.


Comments
Add Comment

Vasundhara Police Station : गाझियाबादच्या पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; उपनिरीक्षकासह डिलिव्हरी बॉय जखमी

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ

Donald Trump : मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय ! व्हाइट हाऊसमध्ये मोठा फेरबदल

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या प्रशासनात महत्त्वाचा बदल केला आहे. ट्रम्प

Kishore Biyani : किशोर बियाणी यांच्या अडचणी वाढल्या; 904 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी CBI कडून FIR

 Kishore Biyani: एकेकाळी भारताचे ‘रिटेल किंग’ म्हणून ओळखले जाणारे किशोर बियाणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्रीय

Stock Market : भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी ! सेन्सेक्स 7 दिवसांत 7,782 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक ठरली आहे. 2 ते 6 नोव्हेंबरदरम्यान

Jio Recharge Plan : जिओचा 10,000 रुपयांचा 3 वर्षांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा दावा

 Jio Recharge Plan: रिलायन्स जिओने 10,000 रुपयांचा तीन वर्षांच्या वैधतेचा नवा प्रीपेड प्लॅन सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

Komal Punjabi : कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांना पदावरून तात्पुरते केले बाजूला...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न