Sunday, November 8, 2026

लाल साडी, नथ अन् मराठमोळा साज! दिवाळीत पूजा सावंतच्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ

दिवाळीचं औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज दिलं आहे. पती सिद्धेश चव्हाण याच्यासोबत तिने पारंपरिक वेशात केलेलं सुंदर छायाचित्रण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. यंदाच्या सणाला पूजाने पूर्णपणे मराठमोळा लूक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

या फोटोमध्ये पूजा आकर्षक लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत असून, तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तिच्या जोडीला सिद्धेशही लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये अगदी उठून दिसत आहे. दोघांच्या एकाच रंगाच्या पोशाखामुळे त्यांची जोडी अधिकच खास वाटत आहे. [Photo: Instagram (Pooja Sawant)] पूजाने या लूकसाठी पारंपरिक दागिन्यांची निवड केली आहे. गळ्यातील हार, कानातील झुमके, कपाळावरील टिकली आणि नाकातील नथ यामुळे तिचा लूक अगदी सणाला साजेसा वाटतो. तिच्या हसण्यातून आणि चेहऱ्यावरील आनंदातून सणाचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे. या फोटोंसोबत पूजाने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट येवो, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नाला आता जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. सध्या सिद्धेश ऑस्ट्रेलियात नोकरीनिमित्त वास्तव्याला आहे, तर पूजा आपल्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दूर असूनही दोघांमधील प्रेम आणि समजूतदारपणा या फोटोंमधून दिसून येतो. सणासुदीला एकत्र येऊन वेळ घालवणं, पारंपरिक पद्धतीने सण साजरा करणं यामुळे त्यांच्या नात्याची गोडी आणखी वाढली आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. पूजाचा हा मराठमोळा अंदाज पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. साधेपणा आणि पारंपरिकपणा जपणारी तिची शैली पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा