Farmers Visit: दुष्काळाच्या सावटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीर; शेतकऱ्यांसोबत वनमंत्री गणेश नाईक यांची दिवाळी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटाचा सामना करत असताना, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पाठीशी उभे राहिले आहे. शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध दिलासादायक उपाययोजना आणि मदतीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी बांधवांना मानसिक बळ देण्यासाठी व त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे रविवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मौजे करपटवाडी येथे भेट देत आहेत.

ठाणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटाचा सामना करत असताना, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पाठीशी उभे राहिले आहे. शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध दिलासादायक उपाययोजना आणि मदतीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी बांधवांना मानसिक बळ देण्यासाठी व त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे रविवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मौजे करपटवाडी येथे भेट देत आहेत.


वनमंत्री गणेश नाईक सकाळी नवी मुंबईहून करपटवाडीच्या दिशेने प्रयाण केले असून, तेथे उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधणार आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अडचणी समजून घेत, शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा आणि विश्वासाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी ते आजची दिवाळी थेट बळीराजासोबत साजरी करणार आहेत. मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शहापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एक नवीन सकारात्मकता आणि आधार भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा प्रशासन हे केवळ कागदोपत्री मदत जाहीर न करता, थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे. तसेच दुष्काळाच्या या कठीण प्रसंगात शासन सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देत असून, कोणताही शेतकरी स्वतःला एकाकी समजू नये, असा स्पष्ट संदेश या दौऱ्याद्वारे देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्वतः आपल्या दारात येऊन समस्या ऐकत असल्याने प्रशासनाची कर्तव्यपरायणता आणि बळीराजाप्रती असणारी आपुलकी अधोरेखित होत आहे.



शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि मदतीच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटावर नक्कीच मात केली जाईल, असा सार्थ विश्वास याप्रसंगी व्यक्त केला जात आहे. वनमंत्री गणेश नाईक यांचा हा दौरा दुष्काळाच्या सावटात चाचपडणाऱ्या बळीराजासाठी केवळ मदतीचा हात नसून, भविष्यात पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहण्यासाठी एक खंबीर मानसिक आधार आणि आशेचा किरण ठरेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर येथील लोहारी सावंगा या गावात जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. तसेच सरकारमधील सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांनी 'KBC'चं अचानक शूटिंग बंद केलं; नेमकं कारण काय?

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह आणि लाडके महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि चिंता वाढवणारी

Thane News: दिवाळी पहाटनिमित्त ठाणे शहरामध्ये 'या' प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20