Mumbai Fire Incident: अंधेरीतील उंच इमारतीला भीषण आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लोखंडवाला ब्रिजजवळ असलेल्या रुणवाल टॉवरमध्ये ही आग लागल्याचे समजते. ही इमारत खूप उंच आहे. यामध्ये तळमजला, बेसमेंट, पोडियम आणि त्यावर अनेक मजले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीतील एका फ्लॅटमधून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, वीज कंपनीचे लोक आणि रुग्णवाहिका देखील पोहोचली. जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आग १७ व्या मजल्यावरील एका घरात लागली होती. घरातील विजेच्या तारा, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इतर घरगुती वस्तूंनी पेट घेतला होता. आगीमुळे संपूर्ण मजल्यावर धूर पसरला होता.





अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दीड तास अथक प्रयत्न केले. अखेर रात्री पावणेअकराच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. या घटनेत ४६ वर्षीय एक व्यक्ती धुरात गुदमरली होती. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धनपत महातू असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. दिवाळीच्या काळात फटाके आणि विजेची उपकरणे यामुळे आगीच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

BMC Bond : म्युनिसिपल बाँडची प्रक्रिया जोरात.. कागदपत्रांची मराठीतून इंग्रजीत भाषांतरासाठी नेमली संस्था

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने वितरीत करण्यात येणाऱ्या महानगरपालिका रोखे अर्थात म्युनिसिपल

BMC News : मागील 20 वर्षांच्या तुलनेत फटाक्यांचा आवाज झाला कमी; मात्र नियमांचे उल्लंघन कायम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर यंदाच्या दिवाळीत ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्याच्या

Special Waste Management: विशेष काळजी योग्य कचरा विल्हेवाटीसाठी मुंबईत ७ ठिकाणी ११ युनिट्स तब्बल तीन युनिट्स स्थानिकांच्या विरोधामुळे पडले बंद प्रति प्रक्रिया केंद्र ४ टन क्षमतेचा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियम अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष

गर्भवती महिलांसाठी मोठी बातमी! कामा रुग्णालयाचा मोठा निर्णय, सुट्टीच्या दिवशीही 'ही' महत्त्वाची सेवा राहणार सुरू

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमधून उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अनेक

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20

Indian Railway Special Trains : रेल्वेचा मोठा दिलासा! सणासुदीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात १८,००० विशेष गाड्या सुरू; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : दिवाळी, दुर्गा पूजा आणि छठ पूजा यांसारख्या प्रमुख सणांच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी