Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

क्रांतीने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, मैत्री आणि प्रेमाच्या सीमारेषेवरील नाजूक नात्यांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चित्रपटाच्या शानदार ट्रेलर लाँच सोहळ्यात तिचे पती आणि वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या जुळ्या मुलींसह सहभागी झाले होते.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या तिच्या नव्या 'मैत्रेया' (Maitreya) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. क्रांतीने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, मैत्री आणि प्रेमाच्या सीमारेषेवरील नाजूक नात्यांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चित्रपटाच्या शानदार ट्रेलर लाँच सोहळ्यात तिचे पती आणि वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या जुळ्या मुलींसह सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर एका विशेष मुलाखतीत क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक अनुभव मांडले. याच संवादादरम्यान क्रांतीने हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या कटू अनुभवांना वाट मोकळी करून दिली.



बॉलिवूडमधून नाकारल्याचा अनुभव


पती समीर वानखेडे यांच्या कामाच्या पद्धतीचा आणि त्यांच्या नावाचा फटका स्वतःच्या अभिनयाच्या व दिग्दर्शनाच्या करिअरला बसला आहे का? असा प्रश्न विचारला असता, क्रांतीने कोणतीही पडदा न ठेवता मोकळेपणाने उत्तर दिले. क्रांती म्हणाली की, "हो, हिंदी चित्रपटसृष्टीत मला काम देणं टाळलं जातं. मग ते दिग्दर्शन असो वा लिखाण, तिथल्या मोठ्या स्टुडिओंना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा नसते. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे." तिने एका प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले की, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रांतीच्या कामाचे कौतुक करत तिचे नाव अनेक हिंदी स्टुडिओंकडे सुचवले होते. मात्र, तिथून थेट नकार आला. "ज्या प्रोजेक्टमध्ये समीर वानखेडे यांचे नाव जोडले जाईल किंवा त्यांच्याशी संबंध असेल, अशा प्रोजेक्टचा भाग आम्हाला व्हायचे नाही," असे स्पष्ट उत्तर त्या स्टुडिओंकडून देण्यात आल्याचे क्रांतीने नमूद केले.



मराठी सिनेसृष्टीचा पाठिंबा आणि प्रेक्षकांचे प्रेम


हिंदी सिनेसृष्टीत नकाराचा सामना करावा लागला असला, तरी क्रांतीने मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी प्रेक्षकांबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली आहे. "हिंदीत जरी त्रास झाला, तरी मराठी सिनेसृष्टीत माझे स्वतःचे हक्काचे लोक आहेत. मराठीत काम करताना इथल्या वाहनांना किंवा सहकलाकारांना या सगळ्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. मराठी प्रेक्षक, कलाकार आणि इथली इंडस्ट्री ज्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, त्याचा मला मनापासून अभिमान वाटतो," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे बॉलिवूडच्या या भूमिकेमुळे वाद पेटला असला, तरी दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीतील तिच्या या नव्या वाटचालीला प्रेक्षक आणि सहकलाकारांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

Comments
Add Comment

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदाची दिवाळी झलक; अगस्त्य-आराध्याचा फोटो चर्चेत

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदा हिने बच्चन कुटुंबीयांच्या दिवाळी सोहळ्याचे फोटो शेअर केले. अगस्त्य नंदा आणि आराध्या

Ashok Saraf Lamborghini video: अशोक सराफांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; मामांनी दिलं मजेशीर उत्तर

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि

Aniruddha Kavya Wedding: वऱ्हाड निघालं ग्रीसला... अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नसोहळ्यासाठी रजनीकांत यांच्यासह पाहुणेमंडळी ग्रीससाठी रवाना

प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांच्या शाही

Blockbuster Sunday Collection: रविवारी बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा दबदबा! 'सीन'चीही दमदार कमाई, 'जेलर 2' आणि 'मूकुथी अम्मन 2'ने किती कोटी कमावले?

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी पाहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा

Farah Khan Fake Viral Video: फराह खानच्या घराला लागली आग? खोट्या अफवांवर फराह खानचे प्रतिउत्तर

Farah Khan Fake Viral Video: चित्रपट निर्माती फराह खान आजकाल सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या ती चित्रपटांपेक्षा तिच्या

Amitabh Bachchan on health: अमिताभ बच्चन यांची तब्येतीबाबत पोस्ट, हाताला त्रास असल्याने चाहत्यांची मागितली माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती.