Farah Khan Fake Viral Video: चित्रपट निर्माती फराह खान आजकाल सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या ती चित्रपटांपेक्षा तिच्या ब्लॉग्समधून जास्त लोकप्रियता आणि पैसा कमवत आहे. नुकतेच, फराह खानने ऑनलाइन पोर्टल्ससाठी एक क्लास घेतला आणि त्यांना नैतिकतेचा धडा शिकवला आहे. आधी एक नृत्यदिग्दर्शक, मग दिग्दर्शक आणि आता युट्युबर बनलेली फराह खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती एखाद्या ब्लॉग किंवा चित्रपटामुळे नाही, तर तिच्या वक्तव्यामुळे. फराहने सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधून खडेबोल सुनावले आहेत.
Dharashiv Fire Incident News: धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर खाक होऊन सहा जणांचा ...
दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी एका सोशल मीडिया पेजने चित्रपट निर्माती फराह खानच्या मुंबईतील इमारतीला आग लागल्याचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे फराहचे चाहते खूप अस्वस्थ झाले. मात्र, प्रत्यक्षात फराहने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल फराहने चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तसेच, अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवून जबाबदारीने वागण्याचे आवाहनही तिने यावेळी केले आहे.
फराह खान इंस्टाग्राम स्टोरी
फराहने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हायरल झालेली पुन्हा शेयर करत स्पष्ट केले की, व्हिडिओमधील इमारत ही तिची इमारत नाही. त्यात तिने सांगितले की, "ऑनलाइन पोर्टल्स, कृपया जबाबदारी घ्या! ही एक बांधकाम सुरू असलेली इमारत आहे. क्लिकबेट बातम्या हेच सर्वस्व नाही!" फराह खानच्या स्पष्टीकरणानंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. फराह खान मुंबईच्या लोखंडवाला भागातील ओबेरॉय स्काय हाइट्समध्ये राहत असून रविवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आग त्यांच्या घरात किंवा इमारतीत लागल्याचा लोकांना संशय आला. मात्र, फराहने स्पष्टीकरण दिले की, व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत बांधकाम सुरू असलेली होती. त्यामुळे फराह आणि तिचे कुटुंब सुरक्षित आहे.